ETV Bharat / sports

भारत विरुद्ध द. आफ्रिका : दक्षिण आफ्रिकेनं घेतली 31 धावांची आघाडी - मोहम्मद सिराज

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस संपला. सध्या टीम इंडियाकडे 36 धावांची आघाडी आहे.

IND vs SA
IND vs SA
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 3, 2024, 3:18 PM IST

Updated : Jan 4, 2024, 2:41 PM IST

केपटाऊन IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे खेळला जात आहे.

सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या डावात 3 गडी गमावून 62 धावा केल्या. भारतीय संघाकडे सध्या 36 धावांची आघाडी आहे. दक्षिण आफ्रिकेचे एडन मार्करम (36) आणि डेव्हिड बेडिंगहॅम (7) क्रिजवर आहेत. सामन्याच्या पहिल्या दिवशी एकूण 23 विकेट पडल्या. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या डावात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनं 9 षटकात 15 धावा देत 6 बळी घेतले. तर जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमारनं 2-2 विकेट घेतल्या.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेची टीम 23.2 षटकांत 55 धावांवर ऑलआऊट झाली. प्रत्युत्तरात, भारतीय संघानं पहिल्या डावात सर्वबाद 153 धावा केल्या. पहिल्या डावात भारताकडे 98 धावांची आघाडी होती.

आफ्रिकेनंतर फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. भारताचा डावखुरा सलामीवीर यशस्वी जयस्वाल 7 चेंडूत 0 धावा करून कागिसो रबाडाचा बळी ठरला. यानंतर कर्णधार रोहित शर्मानं संघाची धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो 50 चेंडूत वैयक्तिक 39 धावांवर नांद्रे बर्जरच्या चेंडूवर मार्को जॅनसेनकरवी झेलबाद झाला. यानंतर शुभमन गिलही 55 चेंडूत 36 धावांवर नांद्रे बर्जरचा बळी ठरला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या श्रेयस अय्यरला नांद्रे बर्जरने 0 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

चहापानापर्यंत भारतीय संघानं 4 गडी गमावून 114 धावांच्या पुढे खेळायला सुरुवात केली. चहापानानंतर भारतीय संघ केवळ 39 धावा करू शकला. टीम इंडियाचे 6 फलंदाज शून्यावर बाद झाले. स्टार फलंदाज विराट कोहली 46 धावा करून बाद झाला, तर केएल राहुल केवळ 8 धावा करू शकला. त्यानंतर फलंदाजीला आलेले रवींद्र जडेजा, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह शून्यावर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले. भारतीय संघाला केवळ 98 धावांची आघाडी घेता आली.

पहिल्या डावात मोहम्मद सिराजनं चमकदार कामगिरी करत आफ्रिकेचे 6 गडी बाद केले. सिराजच्या घातक गोलंदाजीपुढे आफ्रिकेचा एकही फलंदाज टिकू शकला नाही. जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. आपला अखेरचा कसोटी सामना खेळत असलेल्या डीन एल्गर आणि एडन मार्करम यांनी दक्षिण आफ्रिकेच्या डावाला सुरुवात केली. दक्षिण आफ्रिकेला 5 धावांवर पहिला धक्का बसला. मार्करमच्या 4 धावा करून बाद झाला. डीन एल्गरच्या रूपात आफ्रिकेनं दुसरी विकेट गमावली. एल्गर 5 धावा करून बाद झाला. या दोघांनाही मोहम्मद सिराजनं बाद केलं.

9 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर जसप्रीत बुमराहला भारताची तिसरी विकेट मिळाली. त्याने 3 धावांच्या स्कोअरवर ट्रिस्टन स्टब्सला रोहितच्या हातून बाद केलं. दक्षिण आफ्रिकेला चौथा धक्का टोनी डीजॉर्जच्या रूपानं बसला. 2 धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर मोहम्मद सिराजनं त्याला केएल राहुलकडे विकेटच्या मागे बाद केलं.

यानंतर सिराजनं दक्षिण आफ्रिकेला आणखी दोन धक्के दिले. त्यानं डेव्हिड बेडिंगहॅमला 12 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर जयस्वालच्या हातून झेलबाद केलं आणि त्यानंतर मार्को जॅनसेनला राहुलच्या हाती शून्यावर झेलबाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. काइल व्हेरीनच्या रूपाने सिराजला सहावी विकेट मिळाली. तो वैयक्तिक 15 धावांवर गिलच्या हाती झेलबाद झाला.

मुकेश कुमारनं भारताला आठवी विकेट मिळवून दिली. त्यानं केशव महाराजला 3 धावांवर बुमराहकरवी झेलबाद केलं. यानंतर जसप्रीत बुमराहनं 4 धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर नांद्रे बर्जरला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. भारताला शेवटची विकेट मुकेश कुमारने मिळवून दिली. त्यानं कागिसो रबाडाला 5 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद करून दक्षिण आफ्रिकेचा डाव 55 धावांवर गुंडाळला.

दोन्ही संघात बदल : या सामन्यासाठी रोहित शर्मानं संघात दोन मोठे बदल केले. रविचंद्रन अश्विनला वगळण्यात आलं असून त्याच्या जागी रवींद्र जडेजाला संधी मिळाली. यासह शार्दुल ठाकूरलाही संघातून वगळण्यात आलंय. शार्दुलच्या जागी मुकेश कुमारला प्लेइंग 11 मध्ये संधी देण्यात आली. दक्षिण आफ्रिकेच्या संघात 3 बदल करण्यात आले. टेंबा बावुमाच्या जागी ट्रिस्टन स्टब्सचा संघात समावेश करण्यात आला. तर पीटरसनच्या जागी केशव महाराज आणि जेराल्ड कोएत्झीच्या जागी लुंगी एनगिडीला स्थान मिळालंय.

दोन्ही संघाची प्लेइंग 11 :

भारत - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार.

दक्षिण आफ्रिका - डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्करम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को जॉन्सन, केशव महाराज, कागिसो रबाडा, आंद्रे बर्गर, लुंगी एनगिडी.

हे वाचलंत का :

  1. भारतीय महिला संघाचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियानं 3-0 ने केला क्लीन स्वीप

Last Updated : Jan 4, 2024, 2:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.