ETV Bharat / sports

IND vs SA 1st T20 : दक्षिण आफ्रिकेकडून भारताचा 7 विकेट्सने पराभव; इशान किशनची अर्धशतकी खेळी व्यर्थ - cricket News

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने 20 षटकात 4 विकेट गमावत 211 धावा केल्या. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या षटकात 212 धावांचा यशस्वी पाठलाग करत सामना जिंकला.

IND vs SA
IND vs SA
author img

By

Published : Jun 9, 2022, 10:48 PM IST

Updated : Jun 9, 2022, 11:03 PM IST

नवी दिल्लीः भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा सात विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 212 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान 19.1 षटकांत 3 गडी गमावून पूर्ण केले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

दक्षिण आफ्रिका संघाकडून फलंदाजी करताना डेविड मिलर ( Batsman David Miller ) आणि रस्सी व्हॅन डर दुसेन ( Batsman Rassi van der Dussen )यांनी अर्धशतक झळकावले. रस्सीने 46 चेंडूत 75 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 5 षटकार आणि 7चौकारही मारले. मिलरने 31 चेंडूत 64 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 4 चौकार आणि 5 षटकारांचा पाऊस पाडला. तसेच, या दोघांनी नाबाद 131 धावांची शतकी भागीदारीही पूर्ण केली. त्यांच्याव्यतिरिक्त ड्वेन प्रिटोरियस याने 29, यष्टीरक्षक क्विंटन डी कॉक याने 22 आणि कर्णधार टेम्बा बावुमा ( Captain Temba Babuma ) याने 10 धावांचे योगदान दिले. भारताकडून गोलंदाजी करताना भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली.

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियासाठी इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड सलामीला आले. यादरम्यान किशन 48 चेंडूत 76 धावा करून बाद झाला. त्याच्या खेळीत 11 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. तर ऋतुराज 15 चेंडूत 23 धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने 3 षटकार मारले. श्रेयस अय्यर 36 धावा करून बाद झाला. त्याने 27 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकार ठोकला.

शेवटी हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंत यांनी चांगली खेळी केली. पंत 16 चेंडूत 29 धावा करून बाद झाला. त्याच्या खेळीत 2 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. तर पांड्याने 12 चेंडूंत 3 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने नाबाद 31 धावा केल्या. दिनेश कार्तिक केवळ दोन चेंडू खेळू शकला. तो एका धावेवर नाबाद राहिला. अशा प्रकारे भारताने 20 षटकात 4 विकेट गमावून 211 धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेकडून एनरिक नॉर्टजेने 4 षटकांत 36 धावा देत 1 बळी घेतला. केशव महाराजने 3 षटकात 43 धावा देत 1 बळी घेतला. वेन पारनेलने 4 षटकांत 32 धावा देत 1 बळी घेतला. ड्वेन प्रिटोरियसनेही एक विकेट घेतली. त्याने 3 षटकात 35 धावा दिल्या.

हेही वाचा - Indonesia Masters 2022 : सिंधू सेन उपांत्यपूर्व फेरीत दाखल, तर सुमित पोनप्पा जोडी दुसऱ्या फेरीत पराभूत

Last Updated : Jun 9, 2022, 11:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.