ETV Bharat / sports

Ind Vs Pak Asia Cup २०२३ : भारत-पाकिस्तान सामना, पावसामुळे फिरले पाणी, भारताचा डाव संपल्यावर सामना रद्द - India vs Pakistan playing 11

Ind Vs Pak Asia Cup : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सुरुवातीलाच भारताची दाणादाण सुरू झाली. मात्र नंतर डाव सावरला. रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीही तंबूत परतला. त्यानंतर अय्यर आणि शुभमनही बाद झाला. मात्र मधल्या फळीनं चांगली खेळी केली. मात्र आता सामना रद्द करण्यात आला आहे. वाचा पूर्ण बातमी.

Ind Vs Pak Asia Cup
भारत विरुद्ध पाकिस्तान
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2023, 2:09 PM IST

Updated : Sep 2, 2023, 10:01 PM IST

पल्लेकल्ले : Ind Vs Pak Asia Cup : आजच्या भारत पाकिस्तान सामन्यावर पावसाचं पाणी फिरलं आहे. आजचा सामना रद्द करण्या आला आहे. आजच्या सामन्यात सुरुवातीला पावसाचा व्यत्यय आला. त्यावेळी भारताचा बिनबाद २० धावा झाल्या होत्या. त्यानंतर खेळ सुरू झाला तेव्हा थोड्याच फरकानं भारताला दोन दणके बसले. कर्णधार रोहित शर्माबरोबरच आघाडीचा फलंदाज विराट कोहलीही बाद झाला. रोहितने ११ तर कोहलीने फक्त ४ धावा काढल्या. श्रेयस अय्यरचीही विकेट पडली. केवळ १० षटकात भारताचे ३ गडी बाद झाले. यानंतर भारताचा डाव थोडा सावरतोय असं वाटत असतानाच शुभमन गिल याची विकेट गेली आहे. तो फक्त १० धावा काढू शकला. त्याला रौफनं बाद केलं. मैदानावर इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांच्या फलंदाजीनं भारताची बाजू चांगलीच सावरली. २६६ धावा काढून भारतानं पाकिस्तानपुढे २६७ धावांचं आव्हान ठेवलं.

सामन्यात इशान किशन आणि हार्दिक पांड्याने चांगलीच फटकेबाजी केली. इशानचं अर्धशतक आधी पूर्ण झालं. तर पाड्यानंही नंतर अर्धशतक पूर्ण केलं. भारतानं सुरुवातीलाच अनेक चांगले मोहरे गमावल्यानं परिस्थिती बिकट झाली होती. मात्र या दोघांनी डाव सावरला. त्यावेळी ३१ षटकं झाली होती. अजून १९ षटकं बाकी होती. या दोघांचा चांगलाच जम बसला. त्यामुळे भारताला चांगलीच धावांची मजल मारता आली.

त्यानंतर ईशान किशनची विकेट गेली. रौफनं त्याला बाद केलं. रौफची या सामन्यातील ही तिसरी विकेट होती. रौफच्या चेंडूवर बाबरनं त्याला झेलबाद केलं. मैदानावर हार्दिक पांड्या आणि रविद्र जडेजा खेळत होते पांड्याचं अर्धशतक पूर्ण झालं.

शेवटच्या शतकांमध्ये पुन्हा खेळात रंग भरला. भारताच्या आणखी तीन विकेट गेल्या आहेत. पांड्या, जडेजा आणि ठाकूर हे तिघेही तंबूत परतले. पंड्याने ८७ धावा केल्या. शाहीनच्या चेंडूवर आगाने त्याला झेलबाद केलं. तर जडेजा फक्त १४ धावा काढून तंबूत परतला. तर ठाकूरने फक्त ३ धावा काढल्या. भारताचा नववा गडीही बाद झाला. कुलदीप यादव ४ धावा काढून तंबूत परतला. शेवटी भारताच्या नऊ बाद २६६ धावा झाल्या. शेवटची विकेट जसप्रीत बुमराहची पडली. तो १६ धावा काढून झेलबाद झाला. पाकिस्तानपुढे आता २६७ धावांचं आव्हान आहे.

भारत विरुद्ध सामन्याच्या एक दिवस आधीच पाकिस्ताननं आपली प्लेइंग ११ जारी करून टीम इंडियावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. असं असलं तरी कर्णधार रोहित शर्मानं पाऊस आणि हवामानाचा अंदाज घेऊन आपली प्लेइंग इलेव्हन घोषित केली आहे. सामना सुरू झाला असला तरी लगेच पाऊस पडायला लागला. त्यामुळे सामना थांबवण्यात आला होता.

पाकिस्तानचा खेळ सुरू करण्यापूर्वी पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे खेळपट्टीची तपासणी करुन पुन्हा खेळ सुरू करण्यात येईल असं सांगण्यात आलं मात्र आता सामना रद्द करण्यात आला आहे. पावसाचे थांबण्याचे काही चिन्ह दिसत नसल्यानं सामना रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.

भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार),शुभमन गिल, ईशान किशन (यष्टीरक्षक), विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज,

पाकिस्तानचा संघ : फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ

हेही वाचा :

  1. Ind Vs Pak Asia Cup : पाकिस्तानचे 'हे' तीन गोलंदाज ठरू शकतात भारतासाठी डोकेदुखी, जाणून घ्या
  2. Ind Vs Pak Asia Cup २०२३ : पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोणाला फायदा? जाणून घ्या...

Last Updated : Sep 2, 2023, 10:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.