ETV Bharat / sports

WTC Final : तिसऱ्या दिवशी पावसाची शक्यता, जाणून घ्या साउथम्पटनमधील अपडेट - डब्ल्यूटीसी अंतिम सामना

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. आज देखील पावसाची शक्यता आहे.

ind-vs-nz-wtc-final-southampton-weather-update
WTC Final : तिसऱ्या दिवशी पावसाची शक्यता, जाणून घ्या साउथम्पटनमधील अपडेट
author img

By

Published : Jun 20, 2021, 3:09 PM IST

साउथम्पटन - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दुसऱ्या दिवशी पावसामुळे संपूर्ण दिवसाचा खेळ झाला नाही. तत्पूर्वी, पावसामुळे पहिला दिवस वाया गेला. आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. आज देखील पावसाची शक्यता आहे.

इंग्लंडच्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज रविवारी पावसाची शक्यता आहे. दुसऱ्या दिवसाप्रमाणेच तिसऱ्या दिवशी देखील वातावरण ढगाळ असेल. त्याच बरोबर दिवसभरात अधूनमधून पाऊस देखील पडण्याची शक्यता आहे. पहिल्या सत्रात ढगाळ वातावरण असेल. तर दुसऱ्या सत्रात पाऊस पडू शकतो. तिसऱ्या आणि अखेरच्या सत्रात म्हणजे चारच्या सुमारास देखील पावसाची शक्यता आहे. आज दिवसभरात ४३ ते ५१ टक्के पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी अंतिम सामन्यासाठी नाणेफेक करण्यात आली. यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्विकारली. तेव्हा भारताने ६४.४ षटकात ३ बाद १४६ धावा केल्या आहेत. कर्णधार विराट कोहली ४४ तर अजिंक्य रहाणे २९ धावांवर नाबाद आहे. दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात कोणताही अडथळा आला नव्हता. त्यानंतर दुसऱ्या सत्रात तीन वेळा पावसाने खो घातला. खराब प्रकाशामुळे दिवसाचा खेळ संपण्याआधी सामना थांबवावा लागला. साउथम्पटनची खेळपट्टी आणि तेथील हवामान पाहता भारताने पहिल्या डावात जर ३०० धावा केल्या, तरी न्यूझीलंडच्या अडचणी वाढू शकतील. या वातावरणात ही धावसंख्या आव्हानात्मक असेल.

हेही वाचा - IND vs NZ : खराब हवामानामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, भारत ३ बाद १४६ धावा

हेही वाचा - WTC Final : ...तर सामना संपला समजा, वॉर्नची न्यूझीलंडला चेतावणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.