साउथम्पटन - जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या फलंदाजीदरम्यान, न्यूझीलंडचा यष्टीरक्षक बीजे वॉटलिंग याला दुखापत झाली. तरीदेखील त्याने मैदान सोडलं नाही. त्याच्या या लढाऊ वृत्तीचे क्रिकेट रसिकांना भरभरून दाद दिली.
हेही वाचा - WTC Final : ...म्हणून पहिलं षटक फेकताच जसप्रीत बुमराह ड्रेसिंग रूमच्या दिशेने पळत सुटला
रविंद्र जडेजाला धावबाद करण्याच्या नादात वॉटलिंगच्या बोटाला दुखापत झाली. क्षेत्ररक्षकांने वेगाने फेकलेला चेंडू पकडण्याच्या नादात तो वॉटलिंगच्या बोटाला लागला. त्याला खूप जास्त दुखत असल्याचेही दिसत होते. चेंडू लागल्यानंतर लगेचच न्यूझीलंडची मेडिकल टीम मैदानात आली. त्यांनी वॉटलिंगवर प्रथमोपचार केले. बोटाला पट्टी बांधून वॉटलिंग पुन्हा एकदा यष्टीरक्षणासाठी उभा राहिला. त्यानंतर त्यानेच जडेजाचा झेल पकडला. लंचनंतर वॅग्नरच्या गोलंदाजीवर लगेच जडेजा माघारी परतला.
दरम्यान, बीजे वॉटलिंगचा हा अखेरचा सामना आहे. त्याने आपण क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचे आधीच सांगितलं आहे. वॉटलिंगच्या क्रिकेट करियरमधला हा अखेरचा दिवस असल्यामुळे विराट कोहलीनेही त्याला शुभेच्छा दिल्या. सहाव्या दिवशी विराट जेव्हा फलंदाजीला उतरला तेव्हा वॉटलिंगच्या जवळ जाऊन त्याने हस्तांदोलन करत शुभेच्छा दिल्या. विराटच्या या कृतीचे क्रिकेटविश्वातून कौतूक होत आहे.
-
Virat Kohli 🤝 BJ Watling
— ICC (@ICC) June 23, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
A nice gesture from the Indian skipper congratulating the @BLACKCAPS wicket-keeper on the final day of his international career 🙌#WTC21 Final | #INDvNZ | #SpiritOfCricket pic.twitter.com/zcI47UFPAp
">Virat Kohli 🤝 BJ Watling
— ICC (@ICC) June 23, 2021
A nice gesture from the Indian skipper congratulating the @BLACKCAPS wicket-keeper on the final day of his international career 🙌#WTC21 Final | #INDvNZ | #SpiritOfCricket pic.twitter.com/zcI47UFPApVirat Kohli 🤝 BJ Watling
— ICC (@ICC) June 23, 2021
A nice gesture from the Indian skipper congratulating the @BLACKCAPS wicket-keeper on the final day of his international career 🙌#WTC21 Final | #INDvNZ | #SpiritOfCricket pic.twitter.com/zcI47UFPAp
अशी आहे वॉटलिंगची कारकिर्द -
वॉटलिंगने न्यूझीलंडसाठी 75 कसोटी सामने खेळली आहेत. यात त्याने 37.52 च्या सरासरीने 3 हजार 790 धावा केल्या आहेत. यामध्ये 8 शतकं आणि 19 अर्धशतकांचा समावेश आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पहिल्या डावात वॉटलिंग मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरला. त्याला या डावात फक्त एकच धाव करता आली. शमीच्या अप्रतिम चेंडूवर वॉटलिंग क्लिन बोल्ड झाला होता.
हेही वाचा - WTC Final : शमीचा अफलातून चेंडू, अखेरचा कसोटी सामना खेळणाऱ्या वॉटलिंगच्या दांड्या गुल
हेही वाचा - Live Ind Vs NZ WTC Final : चहापानापर्यंत न्यूझीलंडची सावध सुरुवात, विजयासाठी १२० धावांची गरज