ETV Bharat / sports

IND Vs NZ 2nd T20 : न्यूझीलंड विरुद्ध भारताची आज 'करो किंवा मरो' स्थिती, संध्याकाळी 7 वाजता मालिकेतील दुसरा सामना - 2nd t20 live score updates

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना लखनौमध्ये खेळवला जाणार आहे. भारतरत्न अटलबिहारी इकना क्रिकेट स्टेडियमवर आज संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. 3 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 0-1 ने पिछाडीवर आहे.

IND Vs NZ
न्यूझीलंड विरुद्ध भारत
author img

By

Published : Jan 29, 2023, 12:40 PM IST

लखनौ : न्यूझीलंड विरुद्ध पहिला टी-20 सामना गमावलेल्या टीम इंडियाला मालिकेत आपले आव्हान कायम राखण्यासाठी आज 'करो किंवा मरो' अशी स्थिती आहे. भारतीय संघाने गेल्या 11 वर्षांपासून न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर एकही मालिका गमावलेला नाही. जर भारताने आजचा सामना गमावला तर भारत टी-20 क्रमवारीतील आपले पहिले स्थानही गमावून बसेल. त्याचवेळी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारताचा हा दुसरा टी-२० पराभव असेल. पांड्याच्या नेतृत्वाखाली भारत आत्तापर्यंत 7 टी-२० सामने खेळला आहे.

हेड टू हेड : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील लढत नेहमीच चुरशीची राहिली आहे. दोघांनी आतापर्यंत 23 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये भारत आणि न्यूझीलंडने सम-समान म्हणजे 10-10 सामने जिंकले आहेत. तर 3 सामने अनिर्णित राहिले आहेत. लखनौचे अटलबिहारी इकाना क्रिकेट स्टेडियम भारतासाठी लकी राहिले आहे. भारताने येथे खेळलेले दोन्ही सामने जिंकले आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला आजचा सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधायची आहे.

पिच रिपोर्ट : आज लखनौमध्ये हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. तसेच तापमान 11 ते 22 अंश सेल्सिअस राहील. या मैदानावर नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने प्रथम फलंदाजी करणे फायद्याचे ठरू शकते. येथे 5 सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. या मैदानावर आज मोठी धावसंख्या होणे अपेक्षित आहे. रात्रीच्या वेळी मैदानावर दव पडू शकतो, ज्यामुळे नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाचे नुकसान होईल.

पहिल्या सामन्यात भारताचा पराभव : तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडचा धुव्वा उडवल्यानंतर भारताचा न्यूझीलंड विरुद्ध पहिला टी-20 सामना रांची येथे झाला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने भारतापुढे 177 धावांचे लक्ष्य ठेवले. परंतु त्या लक्षाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजी ढेपाळली. एकहाती लढा देणार वाॅशिंग्टन सुंदर व्यतिरिक्त सर्व फलंदाज अपयशी ठरले. टीम इंडियाचा डाव 155 धावांवर संपुष्टात आला व भारताला 21 धावांनी पराभव पत्कारावा लागला.

भारतीय संघ : इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, कुलदीप यादव, उमरान मलिक, अर्शदीप सिंग. न्यूझीलंड संघ : फिन ऍलन, ड्वेन कॉनवे (wk), मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर (c), मायकेल ब्रेसवेल, जेकब डफी, इश सरही, लॉकी फर्ग्युसन आणि ब्लेअर टिकनर.

हेही वाचा : U19 Women World Cup : भारतीय महिला संघाकडे इतिहास रचण्याची संधी, आज इंग्लंड विरुद्ध अंतिम सामना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.