ETV Bharat / sports

T20 World Cup 2022 : अ‍ॅडिलेडच्या ओव्हल मैदानावर विराट-बुमराहने दाखवलीये आपली चमक; अजूनही रेकाॅर्ड भारताच्याच नावावर - अजूनही रेकाॅर्ड भारताच्याच नावावर

भारतीय संघ २ नोव्हेंबरला अ‍ॅडिलेडमध्ये ( Adelaide Oval Ground ) बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. अ‍ॅडिलेड ओव्हल मैदानावर शानदार खेळी खेळण्याचा विक्रम विराट कोहली ( Former Captain Virat Kohli ) आणि सुरेश रैनाच्या नावावर आहे. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी केलेली भागीदारीचा विक्रम ( Biggest Partnership on Adelaide Oval Ground ) अजून अबाधित आहे. तसेच, त्यावेळी जसप्रीत बुमराहने उत्तम गोलंदाजी करीत 3 विकेट्स घेतल्या होत्या. भारतीय संघाने त्यावेळी शानदार विजय मिळवला होता. त्यामुळे आता भारताकडून विजयाची अपेक्षा आहे.

INDIA vs BANGLADESH -T20 World Cup 2022
अ‍ॅडिलेडच्या ओव्हल मैदानावर विराट-बुमराहने दाखवलीये आपली चमक
author img

By

Published : Nov 1, 2022, 7:35 PM IST

अ‍ॅडिलेड : ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या पुढील सामन्यात भारतीय क्रिकेट संघ ओव्हलच्या खेळपट्टीवर शेजारच्या बांगलादेशशी भिडणार आहे. या मैदानावर ( Adelaide Oval Ground ) टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ एकच सामना खेळला असून, त्यात शानदार विजयाची नोंद केली आहे. या सामन्यात कोहलीने त्यावेळी कर्णधारपदाची खेळी खेळली होती. विराट कोहली ( Former Captain Virat Kohli ) आणि सुरेश रैना ( Indian Cricketer Suresh Raina ) यांनी तिसऱ्या विकेटसाठी या मैदानावर सर्वात मोठी ( Biggest Partnership on Adelaide Oval Ground ) भागीदारी करीत भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत केली. अ‍ॅडिलेडमध्ये बांगलादेशचा हा पहिला टी-२० सामना असेल. 2 नोव्हेंबरला होणार्‍या उभय देशांमधील सामन्यापूर्वी या मैदानावर भारतीय संघाची कामगिरी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

ाा
भारतीय संघ अ‍ॅडिलेडमध्ये बांगलादेशविरुद्ध खेळणार तत्पूर्वी भारताची तेथील कामगिरी

अ‍ॅडिलेडच्या ओव्हलवर भारतीय क्रिकेट संघाने आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला असून, या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने शानदार विजय मिळवला. अ‍ॅडिलेड ओव्हलवर खेळल्या गेलेल्या एकमेव सामन्यात त्यावेळी संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहलीने कर्णधारपदाची खेळी खेळली आणि 55 चेंडूत 90 धावा केल्या. त्याच्या कर्णधार खेळीमुळे भारतीय संघाने 3 गडी गमावून 188 धावा केल्या होत्या आणि ऑस्ट्रेलियाला 189 धावांचे लक्ष्य दिले होते. या खेळीत कोहलीने 9 चौकार आणि 2 षटकार मारले.

26 जानेवारी 2016 रोजी खेळल्या गेलेल्या या सामन्यात या खेळपट्टीवर विराट कोहली आणि सुरेश रैना यांच्यात टी-20 सामन्यातील सर्वात मोठ्या भागीदारीचा विक्रमही बनला होता, जो अजूनही अबाधित आहे. विराट कोहली आणि सुरेश रैना यांनी तिसऱ्या विकेटसाठी १३६ धावांची भागीदारी केली होती. यानंतर गोलंदाजी करायला आलेल्या टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ बाद केला आणि भारताने हा सामना 37 धावांनी जिंकला. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराहने शानदार गोलंदाजी करताना 3 बळी घेतले. या सामन्यात रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. कोहलीला त्याच्या या शानदार खेळीसाठी सामनावीराचा किताब देण्यात आला होता. त्यामुळे संघाच्या या दोन्ही खेळाडूंकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

विराट कोहलीला या पिचवरचा उत्तम अनुभव असल्याने तो निश्चितच चांगली कामगिरी पार पाडेन अशी अपेक्षा आहे. तसेच बुमराहनेदेखील या पिचवर उत्तम गोलंदाजी करून आपली चमक दाखवली होती. त्याला या पिचचा अनुभव असल्याने त्याच्याकडून उत्तम खेळाची अपेक्षा आहे. त्यामुळे भारतीय संघ या पिचवर चांगली कामगिरी दाखवण्याची आशा आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.