केपटाऊन : भारतीय महिला संघाने विश्वचषकात तिसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूलँड्सच्या मैदानावर आज ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मागच्या वेळी भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला होता पण विद्यमान चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने भारताचा ८५ धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले होते. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून 2020 च्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आता टीम इंडियाकडे आहे. सलामीला आलेल्या एलिसा हेली आणि बेथ मूनीने डावाची सुरुवात चांगली केली.
भारतीय संघाची फलंदाजी : भारतीय संघाची सुरुवात थोडी निराशाजनक राहिली. टीम इंडियाची सलामीची जोडी लवकरच आऊट झाली. भारताची स्टार फलंदाज स्मृती मंधाना गार्डनरच्या गोलंदाजीवर 2 धावांवर पायचित झाली. त्यानंतर आलेली याशिका भाटिया 4 धावांवर रनआऊट झाली. त्यानंतर आलेल्या जेमिमार रोड्रीग्सने धुवांधार खेळी करीत 24 धावांत 43 धावांची दमदार खेळी केली. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमीमाह रोड्रीग्स या जोडीनेच भारतीय संघाच्या धावफलकाला आकार दिला. हरमनप्रीतने कर्णधारपदाला साजेशी खेळी करीत दमदार 52 धावा ठोकल्या. त्यामुळे तिने सामना रोमांचक मोडमध्ये आणून ठेवला. ती दुर्दैवी धाव घेताना खूप बॅडलकने रनआऊट झाली. तिच्याअगोदर दीप्ती शर्मा ब्राऊनच्या गोलंदाजीवर ताहिलाद्वारे झेलबाद झाली. त्यानंतर आलेली स्नेह राणा जोनसेनद्वारे क्लिन बोल्ड झाली.
ऑस्ट्रेलियाची फलंदाजी : सलामीला आलेल्या एलिसा हेली आणि बेथ मूनीने डावाची सुरुवात चांगली केली. एलिसा हेलीने 26 चेंडूत 25 धावा करून राधा यादवच्या चेंडूवर रिचा घोषने तिला स्टम्पिंगद्वारे बाद केले. तर बेथ मूनीने चांगल्या फाॅर्ममध्ये खेळत असताना ती 37 चेंडूवर 54 धावा करून पॅव्हेलिनमध्ये परतली. तिला शिखा पांडेने शेफाली वर्माद्वारे झेलबाद केले. तिने चौफेर टोलेबाजी करीत टीम इंडियाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्यानंतर आलेल्या अॅश्ले गार्डनरने धमाकेदार खेळी करीत 18 चेंडूत 31 धावा केल्या. तिला दीप्ती शर्माने क्लिनबोल्ड करीत तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर ग्रेस हॅरीस हिच्या शिखा पांडेने यष्टी उडवल्या. ग्रेस हॅरीसने 4 चेंडूत 7 धावा केल्या. दीप्ती शर्माने शेवटपर्यंत लढत राहिली तिने 17 चेंडूत 20 धावा केल्या.
पाचपैकी चार सामने जिंकले : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) या मागील पाच आमने-सामने सामन्यांमध्ये कांगारूंचे वर्चव राहिले आहे. ऑस्ट्रेलियाने पाचपैकी चार सामने जिंकले आहेत तर एक सामना बरोबरीत राहिला आहे. गेल्या पाच टी-२० सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर भारतीय महिला संघाने चमकदार कामगिरी केली आहे. महिला संघाने पाचपैकी तीन जिंकले आहेत. त्याचवेळी दोनमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याचबरोबर कांगारू संघाने मागील पाच टी-20 सामन्यांपैकी चार सामने जिंकले आहेत. त्याचा पाकिस्तानसोबतचा एक सामना पावसामुळे रद्द झाला होता.
नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला प्रथम फलंदाजी : खेळपट्टी आणि हवामान अहवाल महिला टी 20 विश्वचषक उपांत्य फेरीचा सामना न्यूलँड्समधील नवीन खेळपट्टीवर खेळला जाऊ शकतो. या मैदानावर आतापर्यंत 28 टी-20 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 16 वेळा विजय मिळवला आहे. त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघाने 12 वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे नाणेफेक महत्त्वाची ठरणार आहे. नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला प्रथम फलंदाजी करायची असते. हवामान स्वच्छ होईल आणि सूर्य चमकेल. पावसाची शक्यता नाही. प्रेक्षक सामन्याचा आनंद घेऊ शकतात.
गट-टप्प्यात सामने : दुसर्या उपांत्य फेरीत, इंग्लंडचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे, ज्याने थायलंडविरुद्धच्या सामन्यात महिला टी 20 विश्वचषकात सर्वाधिक विजय मिळवून आपले स्थान निश्चित केले. इंग्लंडने 2009 मधील टी 20 विश्वचषकावर दावा केला आणि गट बीचे नेते म्हणून पूर्ण केले आणि त्यांचे चारही गट-टप्प्यात सामने जिंकले. नॅट सायव्हर-ब्रंटच्या नाबाद 81 आणि डॅनी व्याटच्या 59 धावांनी पाकिस्तानविरुद्ध विजय निश्चित केला. केपटाऊनमधील न्यूलँड्स टी-20 विश्वचषकाचे उर्वरित तीन सामने आयोजित करणार आहेत