नवी दिल्ली : तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका टीम इंडियाने गमावली आहे. टीम इंडियाने ही एकदिवसीय मालिका 2-1 ने गमावली. यासोबतच टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मार्कस स्टॉइनिस यांच्यात मैदानावर जोरदार बाचाबाची झाली. विराट कोहलीसोबत मैदानावर अनेकवेळा ऑस्ट्रेलियन खेळाडूंमधले काही टोकदार वाद पाहायला मिळतात. सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ इंटरनेटवर समोर आला आहे. त्यामध्ये कोहलीची संतप्त प्रतिक्रिया स्पष्टपणे दिसत आहे. त्यात कोहली चांगलाच संतापलेला दिसत आहे. शेवटी किंग कोहलीला एवढा राग कशाचा?
-
Marcus Stoinis and Virat Kohli 😹👌🤙 !! #ViratKohli𓃵 #stoinis#INDvsAUS #CricketTwitter pic.twitter.com/tqUFT9exNl
— Diptiman Yadav (@Diptiman_yadav9) March 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Marcus Stoinis and Virat Kohli 😹👌🤙 !! #ViratKohli𓃵 #stoinis#INDvsAUS #CricketTwitter pic.twitter.com/tqUFT9exNl
— Diptiman Yadav (@Diptiman_yadav9) March 22, 2023Marcus Stoinis and Virat Kohli 😹👌🤙 !! #ViratKohli𓃵 #stoinis#INDvsAUS #CricketTwitter pic.twitter.com/tqUFT9exNl
— Diptiman Yadav (@Diptiman_yadav9) March 22, 2023
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल : ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडिया यांच्यात 22 मार्च रोजी चेन्नईच्या चेपॉक क्रिकेट स्टेडियमवर तिसरा एकदिवसीय सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाला पराभव स्विकारावा लागला होता . सामन्यादरम्यान, भारतीय संघाचा किंग कोहली मैदानावर एका किंवा दुसर्या खेळाडूशी वाद घालतो. असाच काहीसा प्रकार या वनडेतही घडला आहे. कांगारू संघाचा अष्टपैलू मार्कस स्टॉइनिस मैदानावर विराट कोहलीला भिडला. भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, दोन्ही खेळाडूंमधील ही टक्कर अचानक झालेली नाही.
विराट कोहलीने शानदार अर्धशतक केले : व्हिडिओ पाहून मार्कस स्टॉइनिसने मुद्दाम विराट कोहलीशी टक्कर दिल्याचे दिसते. दोन्ही खेळाडूंमधील भांडण स्पष्टपणे दिसून येत आहे. चेन्नई सामन्यात कांगारू संघाने भारतीय संघाचा 21 धावांनी पराभव करत 3 सामन्यांची वनडे मालिका जिंकली. या सामन्यात विराट कोहलीने शानदार अर्धशतक केले. यामुळे किंग कोहलीचे चाहते अत्यंत आनंदी आहेत. विराट कोहली सोशल मीडियावर चाहत्यांसोबत पोस्ट शेअर करत असतो. विराट कोहलीने 1 षटकार आणि 2 चौकारच्या मदतीने 54 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोहलीने कारकिर्दीतील 65 वे अर्धशतक झळकावले आहे.
हेही वाचा : ODI World Cup 2023 : विश्वचषक 2023 साठी बीसीसीआयला भरावा लागणार 963 कोटी रुपयांचा कर, वाचा संपूर्ण प्रकरण