नागपूर : आजच्या डावाची सुरुवात झाल्यानंतर मर्फीने जोरदार बाॅलिंग करीत 2 विकेट घेतल्या. सायंकाळचा रखवालदार रविचंद्रन अश्विन याने 62 चेंडूत 23 धावा करुन मर्फीकडून तो एलबीडब्ल्यू झाला. त्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजारा अवघ्या 7 धावा असताना बोलान्डने त्याचा मर्फीच्या चेंडूवर झेल घेतला. आता सध्या विराट 12 धावांवर खेळत आहे. रोहित शर्मा 85 धावांवर खेळत आहे. त्याने 142 चेंडूची शानदार पारी खेळली आहे. सध्या तो खेळत आहे. मर्फीने जोरदार बाॅलिंग करीत 3 विकेट घेतल्या आहेत. दुसऱ्या दिवशीचा डाव संपला तेव्हा टीम इंडियाच्या 7 विकेटवर 321 धावा होत्या.
-
𝐈. 𝐂. 𝐘. 𝐌. 𝐈!
— BCCI (@BCCI) February 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Captain @ImRo45 put up a fine show with the bat to score a superb ton 👌 👌 #TeamIndia | #INDvAUS | @mastercardindia
Relive his knock 🎥 🔽https://t.co/SrdLEu8I7U
">𝐈. 𝐂. 𝐘. 𝐌. 𝐈!
— BCCI (@BCCI) February 10, 2023
Captain @ImRo45 put up a fine show with the bat to score a superb ton 👌 👌 #TeamIndia | #INDvAUS | @mastercardindia
Relive his knock 🎥 🔽https://t.co/SrdLEu8I7U𝐈. 𝐂. 𝐘. 𝐌. 𝐈!
— BCCI (@BCCI) February 10, 2023
Captain @ImRo45 put up a fine show with the bat to score a superb ton 👌 👌 #TeamIndia | #INDvAUS | @mastercardindia
Relive his knock 🎥 🔽https://t.co/SrdLEu8I7U
दुसऱ्या दिवसाची कामगिरी : भारतीय संघाने आज डावाला सुरुवात केली, तेव्हा 77 धावा होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या मर्फीने रविचंद्रन अश्विनला 23 धावांवर तंबूत धाडले, त्यानंतर आलेला चेतश्वर पुजारासुद्धा विशेष कामगिरी करू शकला नाही. तो अवघ्या 7 धावांवर झेलबाद झाला. विराट कोहलीदेखील मर्फीच्या एका चेंडूवर एलेक्स कॅरीद्वारे झेलबाद झाला. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने काही विशेष कामगिरी दाखवली नाही. तो अवघ्या 8 धावांवर क्लिनबोल्ड झाला. नवीन आलेल्या केएस भरतला काही विशेष कामगिरी करता आली नाही. सध्या रविंद्र जडेजाने भक्कमपणे बाजू लावून धरली आहे. त्याने 114 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आहे.
-
150 up for #TeamIndia
— BCCI (@BCCI) February 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Live - https://t.co/SwTGoyHfZx #INDvAUS @mastercardindia pic.twitter.com/upPRD7n6Ib
">150 up for #TeamIndia
— BCCI (@BCCI) February 10, 2023
Live - https://t.co/SwTGoyHfZx #INDvAUS @mastercardindia pic.twitter.com/upPRD7n6Ib150 up for #TeamIndia
— BCCI (@BCCI) February 10, 2023
Live - https://t.co/SwTGoyHfZx #INDvAUS @mastercardindia pic.twitter.com/upPRD7n6Ib
तिन्ही फाॅरमॅटमध्ये शतक : त्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने संयमी खेळी करीत मैदानावर चांगलाच जम बसवला आहे. एका बाजून संघाची धुरा सांभाळत त्याने शानदार शतक ठोकले आहे. तीन्ही फाॅर्ममध्ये 43 वे शतक करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने संयमी खेळी करीत 120 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
-
Lunch on Day 2 of the 1st Test.
— BCCI (@BCCI) February 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Captain @ImRo45 going strong on 85* with Virat Kohli 12* #TeamIndia 151/3, trail by 26 runs.
Scorecard - https://t.co/edMqDi4dkU #INDvAUS @mastercardindia pic.twitter.com/zIMoKcjRyT
">Lunch on Day 2 of the 1st Test.
— BCCI (@BCCI) February 10, 2023
Captain @ImRo45 going strong on 85* with Virat Kohli 12* #TeamIndia 151/3, trail by 26 runs.
Scorecard - https://t.co/edMqDi4dkU #INDvAUS @mastercardindia pic.twitter.com/zIMoKcjRyTLunch on Day 2 of the 1st Test.
— BCCI (@BCCI) February 10, 2023
Captain @ImRo45 going strong on 85* with Virat Kohli 12* #TeamIndia 151/3, trail by 26 runs.
Scorecard - https://t.co/edMqDi4dkU #INDvAUS @mastercardindia pic.twitter.com/zIMoKcjRyT
पहिल्या दिवसाची कामगिरी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 177 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात भारताने 1 विकेट गमावून 77 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून टॉड मर्फीने एकमेव विकेट घेतली. त्याने केएल राहुलला 20 धावांवर बाद केले. कर्णधार रोहित शर्मा (56) आणि आर अश्विन (0) खेळपट्टीवर नाबाद आहेत. दोघेही आज सकाळी साडेनऊ वाजता डावाला सुरुवात करतील. भारत ऑस्ट्रेलियापेक्षा 100 धावांनी मागे आहे.
रविंद्र जडेजाचे जोरदार कमबॅक : भारताला क्षेत्ररक्षणाची जबाबदारी आल्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी सुंदर कामगिरी करीत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना चांगलेच जेरीस आणले. रवींद्र जडेजाने जोरदार कमबॅक करीत ऑस्ट्रेलियाच्या 5 फलंदाजांना तंबूत धाडले. रवींद्र जडेजाने 22 षटकांत 8 ओव्हर मेडन टाकत 5 महत्त्वाच्या विकेट मिळवल्या. तसेच, आतापर्यंत झालेल्या सामन्यात मोहम्मद सिराजने जबरदस्त गोलंदाजी करीत भारताच्या खात्यात एक विकेट मिळवली. अंपायरने ख्वाजाला नॉट आऊट दिले, पण यष्टिरक्षक केएस भरतच्या सांगण्यावरून डीआरएस घेतला. त्यानंतर उस्मान ख्वाजाला आऊट करण्यात आले.
लबुशेनच्या सर्वाधिक धावा : ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लबुशेनने सर्वाधिक 49 धावा केल्या. त्याच्याशिवाय स्टीव्ह स्मिथने 37, अॅलेक्स कॅरीने 36 आणि पीटर हँड्सकॉम्बने 31 धावा केल्या. तर डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा आणि स्कॉट बोलंड यांनी प्रत्येकी 1-1 धावा केला. मॅट रेनशॉ, नॅथन लायन आणि टॉड मर्फी हे तीन खेळाडू एकही धाव न काढता बाद झाले. मर्फीचा हा पहिलाच कसोटी सामना आहे. भारताकडून सहा महिन्यांनंतर कमबॅक करणाऱ्या रवींद्र जडेजाने धारदार गोलंदाजी करत पाच बळी घेतले. त्याला रविचंद्रन अश्विनने तीन बळी घेत उत्तम साथ दिली. तर मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी एक विकेट घेतली.
भारत ऑस्ट्रेलिया हेड टू हेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकूण 102 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाचाच वरचष्मा आहे. ऑस्ट्रेलियाने 43, तर भारताने 30 सामने जिंकले आहेत. या दोघांमध्ये 28 सामने अनिर्णित राहिले आहेत, तर एक सामना बरोबरीत राहिला आहे. पण भारतीय संघाने घरच्या मैदानावर चांगली कामगिरी केली आहे. या दोघांमध्ये भारतीय भूमीवर 50 सामने खेळले गेले आहेत, ज्यात भारताने 21 जिंकले आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने 13 सामने जिंकले आहेत. 15 सामने अनिर्णित राहिले तर एक बरोबरीत राहिला आहे.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, के.एस. भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज; ऑस्ट्रेलिया संघ : डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), नॅथन लॉयन, टॉड मर्फी आणि स्कॉट बोलँड.
हेही वाचा : Anurag Thakur Played Cricket : अनुराग ठाकूर यांची बर्फवृष्टीत फटकेबाजी, लगावले चौकार आणि षटकार!