नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दोन धावा असताना ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. मोहम्मद सिराजने पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर उस्मान ख्वाजाला एलबीडब्ल्यू आऊट केले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला पुन्हा दुसरा धक्काही दोन धावांच्या स्कोअरवर बसला. मोहम्मद शमीने डेव्हिड वॉर्नरला क्लीन बोल्ड केले. वॉर्नरही एक धाव काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी करीत ऑस्ट्रेलिया संघाची पुरती गाळण उडाली. ऑस्ट्रेलियाचे सर्व खेळाडू अवघ्या 177 धावांवर बाद झाले आहेत.
भारतीय संघाचा डाव : ऑस्ट्रेलियाचा सर्व संघ अवघ्या 177 धावांवर बाद झाल्याने भारतीय संघ लवकरच खेळायला उतरला. घरच्या मैदानावर टीम इंडियाने कांगारूंचा धुव्वा उडवला. त्यानंतर भारताने सुरुवात केलेल्या डावात, भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी सुरुवात केली. रोहित शर्माने 69 चेंडूत 56 धावा केल्या, तर केएल राहुलने 71 चेंडूत 20 धावा करून बाद झाला. रविचंद्रन अश्विन सध्या रोहित शर्मासोबत खेळत आहे. या मॅचमध्ये अश्विनसहित मोहम्मद शमीनेदेखील नवीन गोलंदाजीत विक्रम केला आहे.
-
1ST Test. 17.4: Axar Patel to Marnus Labuschagne 4 runs, Australia 44/2 https://t.co/SwTGoyHfZx #INDvAUS @mastercardindia
— BCCI (@BCCI) February 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">1ST Test. 17.4: Axar Patel to Marnus Labuschagne 4 runs, Australia 44/2 https://t.co/SwTGoyHfZx #INDvAUS @mastercardindia
— BCCI (@BCCI) February 9, 20231ST Test. 17.4: Axar Patel to Marnus Labuschagne 4 runs, Australia 44/2 https://t.co/SwTGoyHfZx #INDvAUS @mastercardindia
— BCCI (@BCCI) February 9, 2023
रविंद्र जडेचाचे जोरदार कमबॅक : भारताला क्षेत्ररक्षणाची जबाबदारी आल्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी सुंदर कामगिरी करीत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना चांगलेच जेरीस आणले. रवींद्र जडेजाने जोरदार कमबॅक करीत ऑस्ट्रेलियाच्या 5 फलंदाजांना तंबूत धाडले. रवींद्र जडेजाने 22 षटकांत 8 ओव्हर मेडन टाकत 5 महत्त्वाच्या विकेट मिळवल्या. तसेच, आतापर्यंत झालेल्या सामन्यात मोहम्मद सिराजने जबरदस्त गोलंदाजी करीत भारताच्या खात्यात एक विकेट मिळवली. अंपायरने ख्वाजाला नॉट आऊट दिले, पण यष्टिरक्षक केएस भरतच्या सांगण्यावरून डीआरएस घेतला. त्यानंतर उस्मान ख्वाजाला आऊट करण्यात आले.
-
1ST Test. 49.4: Mohammed Siraj to Alex Carey 4 runs, Australia 144/5 https://t.co/SwTGoyHfZx #INDvAUS @mastercardindia
— BCCI (@BCCI) February 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">1ST Test. 49.4: Mohammed Siraj to Alex Carey 4 runs, Australia 144/5 https://t.co/SwTGoyHfZx #INDvAUS @mastercardindia
— BCCI (@BCCI) February 9, 20231ST Test. 49.4: Mohammed Siraj to Alex Carey 4 runs, Australia 144/5 https://t.co/SwTGoyHfZx #INDvAUS @mastercardindia
— BCCI (@BCCI) February 9, 2023
क्रिकेट चाहत्यांमध्ये जल्लोष : सामना सुरू होण्याआधीपासून क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. नागपूर स्टेडियममध्ये आतापर्यंत ४० हजारांहून अधिक तिकिटांची विक्री झाली आहे. त्यामुळे सामना पाहण्यासाठी येथे लोकांची गर्दी होणार आहे हे निश्चित. हा सामना खूपच रोमांचक होणार आहे. सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ आपली पूर्ण ताकद पणाला लावणार आहेत. या कसोटी मालिकेतील दुसरा सामना १७ फेब्रुवारी रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. टीम इंडिया विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतशिवाय मैदानात उतरणार आहे. त्याच्या जागी केएस भरतला संधी मिळाली आहे.
-
1ST Test. 4.6: Pat Cummins to Rohit Sharma 4 runs, India 26/0 https://t.co/SwTGoyHfZx #INDvAUS @mastercardindia
— BCCI (@BCCI) February 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">1ST Test. 4.6: Pat Cummins to Rohit Sharma 4 runs, India 26/0 https://t.co/SwTGoyHfZx #INDvAUS @mastercardindia
— BCCI (@BCCI) February 9, 20231ST Test. 4.6: Pat Cummins to Rohit Sharma 4 runs, India 26/0 https://t.co/SwTGoyHfZx #INDvAUS @mastercardindia
— BCCI (@BCCI) February 9, 2023
ऑस्ट्रेलियाकडून खेळाडू : ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा, डेव्हिड वॉर्नर, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, अॅलेक्स कॅरी, अॅश्टन अगर, पॅट कमिन्स, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड, टॉड मर्फी/मिशेल स्वेपसन हे खेळाडू भआरताविरूद्ध संघात खेळत आहेत. तर भारताकडून रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज संघात खेळत आहेत. सकाळी 9.30 वाजता हा सामना सुरू झाला.
रवी शास्त्रींचे मत : चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील सुरुवातीच्या सामन्यासाठी रवी शास्त्री यांनी आपल्या इलेव्हनची निवड केली होती. फॉर्ममध्ये नसल्याने उपकर्णधार केएल राहुल ऐवजी शुभमन गीलला मालिकेत स्थान मिळाले पाहिजे, असे मत भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मांडले होते. बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यातील खेळाडूंच्या निवडीवर त्यांनी भाष्य केले होते. केएल राहुल उपकर्णधार असला तरी तो जर फॉर्ममध्ये नसेल तरी त्याला संघात ठेवू नये असे परखड मत रवी शास्त्री यांनी व्यक्त केले होते.
फलंदाजीचा निर्णय : उस्मान ख्वाजा हा 3 बॉलवर 1 रन काढून आऊट झाला. त्याच्या मागोमाग डेव्हीड वॉर्नरही 5 बॉलमध्ये 1 रन काढून तंबूत परतला. मार्नस लॅबशॅन 56 बॉलवर 56 रन केल्या आहेत त्याच्यासोबत स्टीव स्मीथ 32 बॉलवर 6 धावांवर नॉट आऊट आहे. मार्नस लॅबशॅने 6 फोर लगावले आहेत. तर स्टीव स्मीथने 1 फोर माराला आहे. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल यांनी विकेट घेतल्या आहेत. गोलंदाजांकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे.
हेही वाचा : Border Gavaskar Trophy : नागपूरच्या जामठा मैदानावर भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामना रंगणार