मुंबई Ind Vs Afg T20 : अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं. तर विराट कोहलीचं देखील पुनरागमन झालंय.
-
What do you all make of this power-packed T20I squad set to face Afghanistan? 😎#TeamIndia | #INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/pY2cUPdpHy
— BCCI (@BCCI) January 7, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">What do you all make of this power-packed T20I squad set to face Afghanistan? 😎#TeamIndia | #INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/pY2cUPdpHy
— BCCI (@BCCI) January 7, 2024What do you all make of this power-packed T20I squad set to face Afghanistan? 😎#TeamIndia | #INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/pY2cUPdpHy
— BCCI (@BCCI) January 7, 2024
वर्षभरापासून एकही टी 20 सामना खेळला नाही : स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी बीसीसीआयला कळवलं होते की ते टी 20 मध्ये निवडीसाठी उपलब्ध आहेत. अशा स्थितीत या दोन्ही खेळाडूंकडे दुर्लक्ष करणं कठीण गेलं असतं. येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, रोहित आणि विराटनं गेल्या वर्षभरापासून एकही टी 20 सामना खेळलेला नाही.
सिराज, बुमराहला विश्रांती : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी निवड समितीनं वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती दिली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटीतील विजयात सिराज आणि बुमराहनं महत्त्वाची भूमिका बजावली होती. हे दोन्ही वेगवान गोलंदाज आता इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळताना दिसतील. ते इंग्लंड मालिकेसाठी फ्रेश राहावे, अशी भारतीय संघ व्यवस्थापनाची इच्छा आहे.
मालिकेचं वेळापत्रक : भारतीय संघ आणि अफगाणिस्तान यांच्यातील मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारी रोजी मोहाली येथे होणार आहे. त्यानंतर 14 जानेवारीला उभय संघांमधील दुसरा टी 20 सामना इंदूरमध्ये खेळला जाईल. त्यानंतर बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर टी 20 मालिकेतील शेवटचा सामना खेळला जाईल.
अफगाणिस्तान मालिकेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान आणि मुकेश कुमार.
हे वाचलंत का :