ETV Bharat / sports

140 कोटी भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्याकरिता भारतीय संघाचे 11 शिलेदार उतरणार मैदानात; कोण होणार विश्वविजेता? - ind vs aus final 2003

Cricket World Cup 2023 Final : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. रोहित शर्माच्या संघानं या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. आता ते 5 वेळच्या विश्वविजेत्याशी स्पर्धा करणार आहे.

कोण होणार विश्वविजेता
कोण होणार विश्वविजेता
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 19, 2023, 7:06 AM IST

अहमदाबाद Cricket World Cup 2023 Final : भारतीय क्रिकेट संघ इतिहास रचण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषक 2023 चा अंतिम सामना आज गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी भारतीय संघानं पूर्ण तयारी केली आहे. सरकारपासून ते बीसीसीआय आणि सेलिब्रिटी ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वजण आपापल्या परीनं विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी तयारी करत आहेत.

दोन्ही संघांचा स्पर्धेतील आतापर्यंतचा प्रवास : भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी या विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी केलीय. भारतीय संघ आतापर्यंत अजिंक्य राहिलाय. या विश्वचषकात भारताला पराभूत करण्यात कोणत्याही संघाला यश आलेलं नाही. भारतीय संघानं सलग 10 सामने जिंकून अंतिम फेरी गाठलीय. उपांत्य फेरीतही भारतानं न्यूझीलंडला 398 धावांचे लक्ष्य दिलं होतं. हा सामना 70 धावांनी जिंकला होता. ऑस्ट्रेलियन संघानं स्पर्धेतील सुरुवातीचे दोन सामने गमावल्यानंतर अप्रतिम पुनरागमन केलं. त्यानंतर एकही सामना गमावला नाही. कांगारुंनी सलग 8 सामने जिंकून अंतिम फेरी गाठलीय. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. मात्र, या सामन्यात कांगारूंची फलंदाजी ढासळली. त्यानंतर निम्मा संघ अवघ्या 137 धावांत बाद झाला होता.

कोणते खेळाडू महत्त्वाची भूमिका बजावणार : भारताकडून कर्णधार रोहित शर्मा संघाला वेगवान सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल. विराट कोहली हा या विश्वचषकात आतापर्यंत सर्वाधिक 711 धावा करणारा फलंदाज आहे. या विश्वचषकात त्याच्या नावावर 3 शतकं आणि 5 अर्धशतकं आहेत. अंतिम सामन्यातही त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. मोहम्मद शामी हा चेंडूनं विरोधी संघावर सतत कहर करत आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात 7 विकेट घेत त्यानं 'प्लेअर ऑफ द मॅच'चा किताबही पटकावला. या स्पर्धेत अवघ्या 6 सामन्यात 23 बळी घेणारा शमी गोलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर आणि अ‍ॅडम झम्पा या सामन्यात भारतासाठी आव्हान बनू शकतात. या विश्वचषकात डेव्हिड वॉर्नरनं ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंत सर्वाधिक 528 धावा केल्या आहेत. अ‍ॅडम झम्पानं आपल्या संघाकडून सर्वाधिक 22 विकेट घेतल्या आहेत.

हेड टू हेड रेकॉर्ड काय : भारत आणि ऑस्ट्रेलिया एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 150 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यात भारतानं 57 वेळा तर कांगारुंनी 83 वेळा विजय मिळवला आहे. तर 10 सामने अनिर्णित राहिले. उभय संघांमधील मागील 5 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतानं 3 आणि ऑस्ट्रेलियानं 2 सामने जिंकले आहेत. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत दोन्ही संघ 13 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यात ऑस्ट्रेलियानं 8 वेळा आणि भारतानं 5 वेळा विजय मिळवलाय. या विश्वचषकात भारतानं ऑस्ट्रेलियाला 199 धावांवर रोखून सामना 6 विकेटनं जिंकला होता.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन काय :

  • भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, के एल राहुल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह
  • ऑस्ट्रेलिया : ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, अ‍ॅडम झम्पा, जोश हेझलवुड

हेही वाचा :

  1. फायनलमध्ये 'या' खेळाडूची कामगिरी ठरणार निर्णायक; माजी क्रिकेटपटू सुरेंद्र भावे यांची खास मुलाखत
  2. अंतिम सामन्यात अश्विनला संधी मिळेल का? रोहित शर्मानं थेट उत्तर दिलं
  3. असा भारतीय संघ याआधी कधीही बघितला नाही; माजी क्रिकेटपटू यजुर्वेंद्र सिंग यांच्याशी ETV Bharat ची खास बातचीत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.