ETV Bharat / sports

Virat Kohli : कोहलीचा 'विराट' पराक्रम, सचिनच्या ४९ शतकांची बरोबरी

Virat Kohli : विराट कोहलीनं आज या विश्वचषकातील त्याचं दुसरं शतक झळकावलं. यासह त्यानं सचिनच्या एका मोठ्या विक्रमाची बरोबरी केली. जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर बातमी..

Virat Kohli
Virat Kohli
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 5, 2023, 6:16 PM IST

Updated : Nov 5, 2023, 6:37 PM IST

कोलकाता Virat Kohli : रनमशीन विराट कोहलीनं पुन्हा एकदा सिद्ध केलं की तो आधुनिक काळातील महान फलंदाजांपैकी एक आहे. आज त्यानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात सचिन तेंडुलकरच्या आणखी एका विक्रमाची बरोबरी केली. विराटनं आज वनडेतील ४९ वं शतक ठोकलं. या शतकासह त्यानं सचिनच्या शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली. विशेष म्हणजे, कोहलीनं अवघ्या २७७ डावात हा कारनामा केला आहे. सचिनला ४९ वनडे शतक झळकवण्यासाठी ४५२ डाव लागले होते.

३५ व्या वाढदिवशी शतक साजरं केलं : खचाखच भरलेल्या ईडन गार्डन्समध्ये विराटनं रविवारी त्याच्या ३५ व्या वाढदिवशी आपलं ऐतिहासिक ४९ वं एकदिवसीय शतक झळकावलं. हे त्याचं या विश्वचषकातील दुसरं शतक आहे. तो १२१ चेंडूत १०१ धावा करून नाबाद राहिला. त्याच्या खेळीच्या बळावर भारतानं निर्धारित ५० षटकांत ३२६ धावांचा डोंगर रचला. कोहलीसाठी ईडन गार्डन्सवर शतक ठोकणं खास आहे, कारण २००९ मध्ये त्यानं याचं मैदानावर श्रीलंकेविरुद्ध आपलं पहिलं एकदिवसीय शतक झळकावलं होतं.

  • Well played Virat.
    It took me 365 days to go from 49 to 50 earlier this year. I hope you go from 49 to 50 and break my record in the next few days.
    Congratulations!!#INDvSA pic.twitter.com/PVe4iXfGFk

    — Sachin Tendulkar (@sachin_rt) November 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

केवळ २७७ डावांत ४९ शतकांचा विक्रम : विराट कोहलीनं या शतकासह सचिनच्या ४९ वनडे शतकांची बरोबरी केली. सचिन तेंडुलकरनं ४५२ वनडे डावात ४४.८ च्या सरासरीनं १८,४२६ धावां केल्या आहेत. या दरम्यान त्यानं ४९ शतकं ठोकली. या शिवाय त्यानं ९६ अर्धशतकही लगावली आहेत. दुसरीकडे, विराटनं केवळ २७७ डावांत ४९ शतकांचा विक्रम केला. विराटच्या नावे वनडेमध्ये ५८.४८ च्या सरासरीनं १३,६२६ धावा आहेत. या दरम्यान त्यानं तब्बल ७० अर्धशतकही झळकावली आहेत. या यादीत भारताचा कर्णधार रोहित शर्मा ३१ शतकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

हेही वाचा :

  1. Shreyas Iyer Father Interview : श्रेयस अय्यरच्या वडिलांसोबत 'ईटीव्ही भारत'चा 'वन टू वन'; सांगितली अनेक गुपितं

Last Updated : Nov 5, 2023, 6:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.