ETV Bharat / sports

Surendra Nayak Exclusive Interview : भारतीय संघासाठी रोहित शर्मा देवानं दिलेली देणगी - माजी क्रिकेटपटू सुरेंद्र नायक

Surendra Nayak Exclusive Interview : भारताचा कर्णधार रोहित शर्मानं या विश्वचषकात आतापर्यंत आपल्या स्फोटक फलंदाजीनं विरोधी गोलंदाजांमध्ये भीती निर्माण केलीय, असं भारताचे माजी क्रिकेटपटू सुरेंद्र नायक यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितलं.

रोहित शर्मा
रोहित शर्मा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 2, 2023, 2:00 PM IST

हैदराबाद Surendra Nayak Exclusive Interview : माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेंद्र नायक यांनी सध्या सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषक 2023 मधील भारताच्या मोहिमेवर आपलं मत व्यक्त करताना म्हटलंय की, रोहित शर्मा विरोधी गोलंदाजांसाठी धोका बनला आहे. रोहितनं फलंदाजीत सातत्यानं चांगली कामगिरी केलीय. जेव्हा विश्वचषक येतो तेव्हा तो चमकदार कामगिरी करतो. भारतीय कर्णधारानं 6 डावात 66.33 च्या सरासरीनं 398 धावा केल्या आहेत. ज्यात एका शतकाचाही समावेश आहे. त्यानं आपल्या उत्कृष्ट खेळीनं संघाला चांगली सुरुवात करून दिलीय. रोहितच्या उत्कृष्ट फॉर्मबद्दल आपलं मत मांडताना सुरेंद्र नायक यांनी त्याचं भरभरून कौतुक केलं.

रोहित शर्मा देवानं दिलेली देणगी : सुरेंद्र नायक ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले, रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघासाठी देवानं दिलेली देणगी आहे. त्याच्या नावावर अनेक विश्वविक्रम आहेत. हा फलंदाज अष्टपैलू आहे. आक्रमक खेळण्याच्या क्षमतेसोबत तो आवश्यकतेनुसार आपला खेळ बदलू शकतो आणि त्याचवेळी तो संयमानं खेळू शकतो. कोहलीही फलंदाजीत योगदान देत असून त्यामुळं भारताची ट्रॉफी जिंकण्याची शक्यता वाढली आहे.

इंग्लंडची कामगिरी निराशाजनक : स्पर्धेतील सर्व 6 सामने जिंकणारा भारत हा आतापर्यंत एकमेव अपराजित संघ ठरलाय. तर स्पर्धा सुरू होण्यापूर्वी जेतेपदासाठी दावेदार मानल्या जाणाऱ्या गतविजेत्या इंग्लंडची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. यावर नायक म्हणाले की, भारतीय परिस्थितीशी जुळवून घेण्यात अपयश आणि सर्व 50 षटके खेळण्याची मानसिकता नसल्यामुळं इंग्लंडच्या कामगिरीवर परिणाम झालाय. ते पुढं म्हणाले, 'भारताचा संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. पण इंग्लंडनं स्पर्धेत उतरून निराशा केलीय. त्यांचे फलंदाज भारतीय परिस्थितीशी जुळवून घेण्यात अपयशी ठरले आणि पूर्ण 50 षटकं खेळण्याची मानसिकता त्यांच्यात नव्हती. इंग्लिश संघाची कामगिरी अगदीच अनपेक्षित होती. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेच्या दबावाखाली तेही विखुरले, असं मला वाटत असल्याचंही नायक म्हणाले.

भारतीय क्रिकेटमध्ये उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा : नायक यांनी भारतीय क्रिकेटमधील पायाभूत सुविधांचं कौतुक करताना सांगितलं की, उच्च दर्जाच्या सुविधा आणि उच्च-स्तरीय प्रशिक्षकांनी भारतातील देशांतर्गत सर्किटमधून प्रतिभावान क्रिकेटपटू तयार करण्यात भूमिका बजावलीय. भारतातील प्रचंड प्रतिभेमुळं, कोणत्याही खेळाडूला खराब कामगिरी करणं परवडणारं नाही. कारण, असे अनेक खेळाडू आहेत जे त्याचं स्थान घेण्यास तयार आहेत. प्रत्येक राज्य संघाकडं चांगली रक्कम आहे आणि म्हणून ते क्रिकेटवर खर्च करतात.

जागतिक क्रिकेटसाठी सकारात्मक प्रगती : सध्याच्या विश्वचषकात अफगाणिस्तान आणि नेदरलँड्स या संघांनी अनुक्रमे इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या बड्या संघांना पराभूत करून सरप्राईज पॅकेज बनवलं आहे. त्यांच्या यशाबद्दल आपलं मत व्यक्त करताना नायक म्हणाले की, जागतिक क्रिकेटसाठी ही सकारात्मक प्रगती आहे. नायक शेवटी म्हणाले, या विश्वचषकात अफगाणिस्तान आणि नेदरलँड्सनं मोठ्या संघांना पराभूत करून स्पर्धेत प्रभावी कामगिरी केलीय. डेहराडून, लखनऊ आणि दिल्लीत सराव करत असताना अफगाणिस्तान जवळजवळ अर्धे वर्ष भारतातच राहतो. तर नेदरलँडचे खेळाडू इतर देशांमध्ये खेळल्या जाणार्‍या स्पर्धांमध्ये भाग घेतात आणि म्हणूनच त्यांच्यासाठी ते उपयुक्त ठरतंय, असंही सुरेंद्र नायक म्हणाले.

हेही वाचा :

  1. 7 Records in NZ vs SA Match : न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका सामन्यात आफ्रिकेनं केले 'हे' सात विक्रम
  2. Ajay Ratra Interview : पंड्याला दुखापत झाल्यानं रोहित-विराटनं एकत्र विश्वचषकात सहाव्या गोलंदाजाची भूमिका निभवावी : अजय रात्रा
  3. Cricket World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाला दुष्काळात तेरावा महिना! ग्लेन मॅक्सवेल नंतर 'हा' स्फोटक फलंदाज इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून 'आऊट'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.