अहमदाबाद Cricket World Cup Final : क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना अविस्मरणीय बनवण्यासाठी आयसीसीनं एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात यापूर्वीच्या सर्व विश्वविजेत्या कर्णधारांना आमंत्रित केलंय. हा सामना पाहण्यासाठी आयसीसीनं 1975 ते 2019 या कालावधीतील विश्वविजेत्या संघांच्या कर्णधारांना आमंत्रित केलंय. या सर्व कर्णधारांना खास ब्लेझरही देण्यात येणार आहे. सामना पाहताना हे सर्व कर्णधार ब्लेझर घालून बसतील.
-
The theme of BCCI officials felicitating World Cup winning captains on November 19th. pic.twitter.com/MWuFy8Mesh
— Johns. (@CricCrazyJohns) November 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The theme of BCCI officials felicitating World Cup winning captains on November 19th. pic.twitter.com/MWuFy8Mesh
— Johns. (@CricCrazyJohns) November 17, 2023The theme of BCCI officials felicitating World Cup winning captains on November 19th. pic.twitter.com/MWuFy8Mesh
— Johns. (@CricCrazyJohns) November 17, 2023
भारतीय संघ बनला पहिल्यांदा विश्वविजेता : एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या पहिले तीन हंगाम 50 षटकांचे नसून 60 षटकांचे झाले होते. वेस्ट इंडिजनं क्लाइव्ह लॉईडच्या नेतृत्वाखाली 1975 आणि 1979 मध्ये सलग दोन विश्वचषक जिंकले. त्यानंतर कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघानं 1983 च्या विश्वचषकात इतिहास रचला होता. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतानं केवळ 183 धावा केल्या. परंतु भारतीय संघानं शानदार गोलंदाजी करत दोन वेळच्या विश्वविजेत्यांचा डाव अवघ्या 140 धावांवर रोखला.
इम्रान खान यांचं येणं अशक्य : 1987 च्या विश्वचषकाचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात झाला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या 254 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ केवळ 246 धावाच करु शकला. अॅलन बॉर्डरच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियानं प्रथमच विश्वचषक जिंकला. 1992 मध्ये पाचवा विश्वचषक झाला. यात प्रथमच पाकिस्ताननं कर्णधार इम्रान खानच्या नेतृत्वाखाली हा विश्वचषक जिंकला. अंतिम सामना पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात झाला होता. मात्र इम्रान खान हे तुरुंगात असल्यानं त्यांचं येणं अशक्य आहे.
ऑस्ट्रेलियाची विश्वविजयाची हॅट्रीक : श्रीलंकेनं अर्जुना रणतुंगाच्या नेतृत्वाखाली 1996 मध्ये विश्वचषक जिंकला, पण अर्जुना रणतुंगासाठी भारतात येणं कठीण आहे. रणतुंगानं अनेकवेळा भारतीय क्रिकेट बोर्डावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर 1999 मध्ये ऑस्ट्रेलियानं स्टीव्ह वॉच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला. नंतरच्या विश्वचषकात रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियानं 2003 आणि 2007 मध्ये विश्वचषक जिंकला होता.
28 वर्षांनी भारत पुन्हा विश्वविजेता : त्यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं 2011 मध्ये 28 वर्षांनी विश्वचषक जिंकला होता. मायकेल क्लार्कच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियानं 2015 मध्ये पाचव्यांदा विश्वचषक जिंकला होता. 2019 ची विश्वचषक स्पर्धा इंग्लंडनं जिंकली. इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडनं प्रथमच विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं.
हेही वाचा :