ETV Bharat / sports

Cricket World Cup २०२३ : 'हा माझ्यापेक्षाही चांगला गोलंदाज', वसीम अक्रमही झाला बुमराहच्या गोलंदाजीवर फिदा - जसप्रीत बुमराह

Cricket World Cup २०२३ : विश्वचषकात रविवारी झालेल्या सामन्यात टीम इंडियानं आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या बळावर इंग्लंडचा पराभव केला. भारताच्या गोलंदाजी आक्रमणाचं नेतृत्व करणाऱ्या जसप्रीत बुमराहनं या सामन्यात ३ बळी घेतले. आता पाकिस्तानचा माजी दिग्गज गोलंदाज वसीम अक्रमनं बुमराहच्या या कामगिरीचं उघडपणे कौतूक केलं आहे.

Wasim Akram praised Jasprit Bumrah
Wasim Akram praised Jasprit Bumrah
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 30, 2023, 3:47 PM IST

लखनऊ Cricket World Cup २०२३ : क्रिकेट विश्वचषकात रविवारी झालेल्या सामन्यात भारतानं गतविजेत्या इंग्लंडला १०० धावांनी धूळ चारत उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. मात्र, या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ सुरुवातीला अडखळला होता. भारतानं ४० धावांवर तीन विकेट गमावल्या. विश्वचषकाच्या इतिहासात विराट कोहली पहिल्यांदाच शून्यावर बाद झाला.

इंग्लंडला १२९ धावांवर ऑलआऊट केलं : यानंतर कर्णधार रोहित शर्मानं आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत भारताचा डाव सावरला आणि १०१ चेंडूत ८७ धावा केल्या. मात्र त्यानंतर एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आलं नाही. प्रथम फलंदाजी करताना भारतानं इंग्लंडसमोर ५० षटकांत २२९ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. तसं पाहिलं तर, इंग्लंडच्या बलाढ्य फलंदाजी समोर हे लक्ष्य किरकोळ होतं. मात्र भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत इंग्लंडला अवघ्या १२९ धावांवर ऑलआऊट केलं, आणि साहेबांवर १०० धावांनी धमाकेदार विजय मिळवला.

काय म्हणाला वसीम अक्रम : टीम इंडियाच्या या शानदार गोलंदाजीवर आता पाकिस्तानचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज वसीम अक्रमही फिदा झाला आहे. अक्रमनं जसप्रीत बुमराहचं खूप कौतुक केलं. वसीम अक्रमनं स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितलं की, बुमराह जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. अक्रम बुमराहमुळे इतका प्रभावित झाला की त्यानं त्याला त्याच्यापेक्षा चांगला गोलंदाज म्हटलंय. 'बुमराहचं चेंडूवरील नियंत्रण माझ्यापेक्षा बरंच चांगलं आहे. तो सर्व प्रकारचे चेंडू टाकू शकतो. त्याच्या गोलंदाजी आक्रमणात विविधता आहे. तो पूर्ण गोलंदाज आहे', असं अक्रमनं सांगितलं.

  • Wasim Akram on Jasprit Bumrah: (A Sports)

    - He has got better control with new ball than myself.
    - He is the Best bowler in the world.
    - He is the Top of the ladder.
    - He is a complete bowler.
    - He has all the variation in his armory.

    - Bumrah is the 🐐...!!!! pic.twitter.com/Oo18Hm4E4k

    — CricketMAN2 (@ImTanujSingh) October 30, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जसप्रीत बुमराहचा शानदार कमबॅक : दुखापतीमुळे सुमारे एका वर्षानंतर पुनरागमन करत असलेला जसप्रीत बुमराह या वर्ल्ड कपमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे. त्यानं इंग्लंडविरुद्ध शानदार कामगिरी करत ३ बळी घेतले. वर्ल्ड कप २०२३ मधील टॉप ५ गोलंदाजांच्या यादीत बुमराह १४ विकेट्ससह दुसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज अ‍ॅडम झम्पा १६ विकेट्ससह सध्या अव्वल स्थानावर आहे.

हेही वाचा :

  1. Cricket World Cup २०२३ : भारतानं साहेबांची जिरवली, 'विश्वविजेते' स्पर्धेतून बाहेर!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.