नवी दिल्ली : चालू विश्वचषकात विराट कोहलीच्या बॅटनं सर्वांचीच बोलती बंद केली आहे. रविवारी नेदरलॅंडविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात त्यानं पुन्हा एकदा शानदार फलंदाजीचं प्रदर्शन केलं. या सामन्यात विराट कोहलीनं ५६ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं ५१ धावा ठोकल्या.
-
1⃣5⃣0⃣ up for #TeamIndia! 🙌
— BCCI (@BCCI) November 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Virat Kohli & Shreyas Iyer in the middle 👌
Follow the match ▶️ https://t.co/efDilI0KZP#CWC23 | #MenInBlue | #INDvNED pic.twitter.com/wcLoKTGt4b
">1⃣5⃣0⃣ up for #TeamIndia! 🙌
— BCCI (@BCCI) November 12, 2023
Virat Kohli & Shreyas Iyer in the middle 👌
Follow the match ▶️ https://t.co/efDilI0KZP#CWC23 | #MenInBlue | #INDvNED pic.twitter.com/wcLoKTGt4b1⃣5⃣0⃣ up for #TeamIndia! 🙌
— BCCI (@BCCI) November 12, 2023
Virat Kohli & Shreyas Iyer in the middle 👌
Follow the match ▶️ https://t.co/efDilI0KZP#CWC23 | #MenInBlue | #INDvNED pic.twitter.com/wcLoKTGt4b
जवळपास १०० ची सरासरी : विराट कोहली या खेळीसह विश्वचषक २०२३ मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्यानं दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज क्विंटन डी कॉक आणि न्यूझीलंडचा रचिन रवींद्र यांना मागं टाकलं. आता या विश्वचषकात विराटच्या नावे ९ सामन्यात ५९४ धावा आहेत. विशेष म्हणजे या दरम्यान त्याची सरासरी ९९.०० एवढी राहिली.
टॉप ५ फलंदाज : या सामन्यापूर्वी, विराट कोहली विश्वचषक २०२३ मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर होता. स्पर्धेत चार शतकं झळकवणारा क्विंटन डी कॉक आता ५९१ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर रचिन रवींद्रनं ९ सामन्यात ५६५ धावा ठोकल्या आहेत. तो तिसऱ्या स्थानी आहे. चौथ्या स्थानावर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (५०३ धावा), असून पाचव्या स्थानावरील डेव्हिड वॉर्नरच्या नावे ४९९ धावा आहेत. आफ्रिकेच्या रॅसी व्हॅन डर डुसेननं ४४२ धावा केल्या आहेत.
टॉप ५ गोलंदाज : वर्ल्ड कप २०२३ मध्ये सर्वाधिक विकेट घेणार्या टॉप ५ गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर, या यादीत एकाही भारतीयाचा समावेश नाही. ऑस्ट्रेलियाचा अॅडम झम्पा २२ विकेट्स घेऊन पहिल्या क्रमांकावर आहे. तर २१ विकेटसह श्रीलंकेचा दिलशान मधुशंका दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा जेराल्ड कोटजे (१८), पाकिस्तानचा शाहीन शाह आफ्रिदी (१८) आणि दक्षिण आफ्रिकेचा मार्को जॉन्सन (१७) यांचा क्रम लागतो.
हेही वाचा :