ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 SL vs NED : श्रीलंकेनं नेदरलँड्सचा 5 गडी राखून केला पराभव - श्रीलंका आणि नेदरलँड

Cricket World Cup 2023 SL vs NED : विश्वचषकातील 19 वा सामना श्रीलंकेसाठी खास होता. लखनौ येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात श्रीलंकेनं नेदरलँड्सचा 5 विकेट्सनें पराभव करत या स्पर्धेतील पहिला विजय मिळवला.

Cricket World Cup 2023 SL vs NED
Cricket World Cup 2023 SL vs NED
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 21, 2023, 10:26 AM IST

Updated : Oct 21, 2023, 6:53 PM IST

लखनऊ Cricket World Cup 2023 SL vs NED : श्रीलंकेनं विश्वचषकात पहिला सामना जिंकलाय. विश्वचषकातील 19 वा सामनात श्रीलंकेनं नेदरलँड्सचा 5 विकेट्सनं पराभव करत पहिला विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना नेदरलँड्कडून सायब्रँड एंजेलब्रेक्ट (70), लोगान व्हॅन बीक (59) यांच्या खेळीच्या जोरावर 262 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या संघानं 48.2 षटकांत 263 धावा करत सामना जिंकला. गेल्या चार सामन्यांमधला श्रीलंकेचा हा पहिलाच विजय आहे.

नेदरलँड्सनं दिलेल्या 263 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेला पहिला धक्का कुसल परेराच्या (18) रूपानं लवकर बसला. यानंतर कुसल मेंडिस 11 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. याशिवाय चरिथ असलंका 44 धावा करून बाद झाला तर, धनंजय डी सिल्वा 30 धावा करून बाद झाला. पथुम निसांका (54), सदिरा समरविक्रमानं संघाला विजय मिळवून दिला. सदीरानं 7 चौकारांच्या मदतीनं नाबाद 91 धावा केल्या. या स्पर्धेतील सदीराची ही दुसरी मोठी खेळी आहे.

नेदलॅंडची खराब सुरवात : नेदरलँड्सनं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर चौथ्या षटकात विक्रमजीत सिंग (4) धावावर बाद झाला. त्यानंतर मॅक्स ओ'डॉड (16), कॉलिन अकरमन (29) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली. बास डी लीडे (6), तेजा नदामानुरू (9), कर्णधार स्कॉट एडवर्ड्स (16) यांना मोठा डाव खेळता आला नाही. नेदरलँड्सनं 91 धावांत 6 विकेट गमावल्या होत्या. संघाच्या कठिन काळात एंजेलब्रेक्ट तसंच लोगन व्हॅन बीक (59) यांनी सामना सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी सातव्या विकेटसाठी 130 धावांची भागीदारी केली.

श्रीलंकेनं विश्वचषकात तिन्ही सामने गमावले : विश्वचषकातील 19 वा सामना श्रीलंका-नेदरलँड यांच्यात लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर सरु आहे. श्रीलंकेनं यंदाच्या विश्वचषकात तिन्ही सामने गमावले आहेत. त्याचबरोबर नेदरलँड्सनं तीनपैकी एक सामना जिंकला आहे. आजही श्रीलंका नेदरलँडविरुद्ध विजयाची अपेक्षा घेऊन खेळाला सुवात केलीय. श्रीलंकेचे खेळाडूही दुखापतींनी त्रस्त आहेत. कर्णधार दासुन शनाका दुखापतीमुळं आधीच बाहेर आहे, पाथिराना, परेराही दुखापतग्रस्त आहेत.

दोन्ही संघांमध्ये झालेले सामने : श्रीलंका आणि नेदरलँड यांच्यात आतापर्यंत 5 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये श्रीलंकेनं पाचही सामने जिंकले आहेत. नेदरलँड्सला एकही सामना जिंकता आलेला नाही. या सामन्यात नेदरलँडनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याच निर्णय घेतलाय.

काय आहे प्लेइंग इलेव्हन :

श्रीलंका : विक्रमजीत सिंह, मैक्स ओडोड, कॉलिन एकरमैन, बास डी लीडे, साइब्रांड एंगेलब्रेक्ट, तेजा निदामानुरु, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार/ यष्टिरक्षक), लोगान वैन बीक, रुलोफ वैन डेर मेरवे, आर्यन दत्त, पॉल वैन मीकेरेन

नेदरलँड : थुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (कर्णधार/ यष्टिरक्षक), सदीरा समरविक्रमा, चैरिथ असलांका, धनंजय डी सिल्वा, दुषान हेमंथा, चमिका करुणारत्ने, महीश थीक्षाना, कसून रजिथा, दिलशान मदुशंका

हेही वाचा -

  1. World Cup 2023 AUS vs PAK : ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी पाडला धावांचा पाऊस, पाकिस्तानी गोलंदाज 'धुतल्यानं' 'हे' विक्रमही गेले वाहून
  2. Cricket World Cup २०२३ : ऑस्ट्रेलियाचं वर्ल्डकपमध्ये दमदार पुनरागमन, पाकिस्तानला ६२ धावांनी हरवलं
  3. Cricket World Cup २०२३ : हार्दिकच्या दुखापतीनंतर न्यूझीलंडविरुद्ध कोणाला मिळेल संधी? 'हे' आहेत फेवरेट्स

Last Updated : Oct 21, 2023, 6:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.