अहमदाबाद Cricket World Cup 2023 SA vs AFG : यंदाच्या क्रिकेट विश्वचषकातील 42 वा सामना आज दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी हा सामना 16 नोव्हेंबर रोजी होणार्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यापुर्वी सरावासारखा असेल. दुसरीकडं, अफगाणिस्तानला हा सामना जिंकून आपल्या यंदाच्या अविस्मरणीय विश्वचषक मोहिमेला अलविदा करायचा प्रयत्नात असणार आहे.
उपांत्य फेरी गाठण्यासाठी अफगाणिस्तानसमोर अशक्यप्राय आव्हान : अफगाणिस्तानचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीत अजूनही आहे. पण, अंतिम चारमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना आफ्रिका संघाचा तब्बल 438 धावांनी पराभव करावा लागेल, जे जवळपास अशक्य आहे. अशा परिस्थितीत आजचा सामना अफगाणिस्तान संघासाठी या विश्वचषकातील शेवटचा सामना असू शकतो. अफगाणिस्तान संघानं या विश्वचषकात 8 पैकी 4 सामने जिंकून चमकदार कामगिरी केली. त्यांनी इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांना पराभूत केलंय. ऑस्ट्रेलियाविरुद्धही ते मोठ्या विजयाच्या जवळ होते. पण, मॅक्सवेलनं कामगिरी करून संघाला विजय मिळवून दिला. दुसरीकडं या विश्वचषकात दक्षिण आफ्रिका चॅम्पियनप्रमाणं खेळलाय. त्यांनी 8 पैकी 6 सामने जिंकत आपली दावेदारी मजबूत केलीय.
-
Will Afghanistan finish their most successful CWC campaign on a high? 🤔#CWC23 | #SAvAFG pic.twitter.com/pCGXU4syk6
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) November 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Will Afghanistan finish their most successful CWC campaign on a high? 🤔#CWC23 | #SAvAFG pic.twitter.com/pCGXU4syk6
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) November 10, 2023Will Afghanistan finish their most successful CWC campaign on a high? 🤔#CWC23 | #SAvAFG pic.twitter.com/pCGXU4syk6
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) November 10, 2023
- उभय संघांमध्ये खेळण्यात आलेल्या सामन्यांबद्दल बोलायचं झालं तर आत्तापर्यंत उभय संघांमध्ये केवळ एकच एकदिवसीय सामना खेळला गेला. ज्यात आफ्रिकेनं बाजी मारलीय तर अफगाणिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
खेळपट्टी कशी असेल : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी अतिशय योग्य आहे. त्यामुळं आज होणाऱ्या आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात मोठी धावसंख्या बघायला मिळू शकते. वेगवान गोलंदाजांना सामन्याच्या सुरुवातीला स्विंग मिळू शकते. नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही चांगला आधार देते. इथं सुरू असलेल्या स्पर्धेत खेळल्या गेलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांपैकी कोणत्याही संघानं 300 चा टप्पा ओलांडला नाही, जे खेळपट्टीचं संतुलन दर्शवतं.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन कशी असेल :
- दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक (यष्टिरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, तबरेझ शम्सी
- अफगाणिस्तान : रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल (यष्टिरक्षक), अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, नवीन-उल-हक