नवी दिल्ली Cricket World Cup 2023 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने आज ऑक्टोबर २०२३ च्या 'प्लेअर ऑफ द मंथ' (महिन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू) पुरस्काराची घोषणा केली. न्यूझीलंडचा डावखुरा फलंदाज रचिन रवींद्रनं विश्वचषक स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीनंतर पहिल्यांदाच हा पुरस्कार जिंकला. तर ऑस्ट्रेलियात टी २० मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या वेस्ट इंडिजच्या हेली मॅथ्यूला महिला खेळाडूंमध्ये 'प्लेअर ऑफ द मंथ'चा पुरस्कार मिळाला.
-
Rachin Ravindra won the ICC Men's player of the month award for October 2023.
— Johns. (@CricCrazyJohns) November 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
- The future of Kiwis. ⭐ 🏏 pic.twitter.com/3k1gSvtP1u
">Rachin Ravindra won the ICC Men's player of the month award for October 2023.
— Johns. (@CricCrazyJohns) November 10, 2023
- The future of Kiwis. ⭐ 🏏 pic.twitter.com/3k1gSvtP1uRachin Ravindra won the ICC Men's player of the month award for October 2023.
— Johns. (@CricCrazyJohns) November 10, 2023
- The future of Kiwis. ⭐ 🏏 pic.twitter.com/3k1gSvtP1u
चालू विश्वचषकात दमदार कामगिरी : रचिन रवींद्रनं चालू विश्वचषकाच्या साखळी सामन्यांमध्ये शानदार फलंदाजी केली आहे. त्याच्या या कामगिरीच्या बळावर त्याला प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारानं गौरवण्यात आलं. विशेष म्हणजे, या विश्वचषकापूर्वी तो केवळ १२ एकदिवसीय सामने खेळला होता. त्यानं विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात गतविजेत्या इंग्लंडविरुद्ध शानदार शतक झळकावून लोकांचं लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर नेदरलँड्स विरुद्ध (५१) आणि भारताविरुद्ध (७५) आपली उत्कृष्ट कामगिरी सुरूच ठेवली. त्यानंतर धर्मशाला येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या रोमहर्षक सामन्यातही त्यानं शानदार शतक झळकावलं. त्यानं ८९ चेंडूत ११६ धावा ठोकल्या. विश्वचषकात रवींद्रनं आतापर्यंत ८१.२० च्या सरासरीनं ४०६ धावा केल्या आहेत.
-
I'm living the dreams , leading run scorer in WC that's to in India.
— Rachin Ravindra (@RachinRavindra_) November 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Great atmosphere, good win, thank you to all the fans for your support 🇳🇿 #NZvsSL pic.twitter.com/Gh7bWfgOrK
">I'm living the dreams , leading run scorer in WC that's to in India.
— Rachin Ravindra (@RachinRavindra_) November 9, 2023
Great atmosphere, good win, thank you to all the fans for your support 🇳🇿 #NZvsSL pic.twitter.com/Gh7bWfgOrKI'm living the dreams , leading run scorer in WC that's to in India.
— Rachin Ravindra (@RachinRavindra_) November 9, 2023
Great atmosphere, good win, thank you to all the fans for your support 🇳🇿 #NZvsSL pic.twitter.com/Gh7bWfgOrK
पुरस्कार मिळाल्यानंतर काय म्हणाला : पुरस्कार मिळाल्यानंतर प्रतिक्रिया देताना रचिन रवींद्र म्हणाला की, 'हा पुरस्कार जिंकल्याबद्दल मी खूप आभारी आहे. संघासाठी आणि वैयक्तिकरित्या हा एक विशेष महिना राहिला. भारतात विश्वचषक खेळणं खरोखरच खास होतं'. तो पुढे म्हणाला की, 'संघाचा पाठिंबा मला खूप मदत करतो. तुम्ही खूप मोकळेपणाने क्रीजवर जाऊन तुमचा नैसर्गिक खेळ खेळू शकता. सुदैवानं फलंदाजीसाठी विकेट खरोखरच चांगल्या आहेत, ज्या माझ्या खेळाला अनुकूल आहेत', असं त्यानं नमूद केलं.
हेही वाचा :