कोलकाता Cricket World Cup २०२३ : क्रिकेट विश्वचषकातील ३१ वा सामना आज ईडन गार्डन्सवर पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात खेळला गेला. या सामन्यात पाकिस्ताननं बांग्लादेशवर ७ गडी राखून विजय मिळवला आहे. या सामन्यात बांग्लादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना बांग्लादेशनं ४५.१ षटकांत सर्वबाद २०४ धावा केल्या. पाकिस्ताननं हे लक्ष्य ३२.३ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात गाठलं.
बांग्लादेशची फलंदाजी ढेपाळली : प्रथम फलंदाजी करताना बांग्लादेशची सुरुवात खराब झाली. सलामीवरी तन्झीद हसन शून्यावर परतला. त्यापाठोपाठ शांतो आणि मुशफिकुर रहीम स्वस्तात परतले. लिट्टन दासनं एका टोकानं किल्ला लढवला. त्याला महमदउल्लाहनं चांगली साथ दिली. दास ६४ चेंडूत ४५ धावा करून बाद झाला. तर महमदउल्लाहनं ७० चेंडूत ५६ धावांचं योगदान दिलं. कर्णधार शाकीब अल हसनच्या ४३ धावांच्या बळावर बांग्लादेशनं २०४ धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद वसीम जूनियरनं ३-३ बळी घेतले.
पाकिस्तानी ओपनर्सची धमाकेदार बॅटिंग : २०५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानी ओपनर्सनं धमाकेदार सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी शतकीय भागेदारी केली. अब्दुल्ला शफीक ६९ चेंडूत ६८ धावा करून बाद झाला. तर फखर झमाननं ७४ चेंडूत ७ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीनं ८१ धावा ठोकल्या. पाकिस्ताननं हे लक्ष्य अवघ्या ३२.३ षटकांत ३ गडी गमावून गाठलं. बांग्लादेशकडून मेहदी हसन मिराजनं तीनही बळी घेतले.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :
- पाकिस्तान : अब्दुल्ला शफीक, फखर झमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, आघा सलमान, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम जूनियर, हरिस रौफ, उसामा मीर
- बांगलादेश : तन्झीद हसन, लिट्टन दास, नजमुल हुसेन शांतो, शाकीब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), महमदउल्लाह, मेहदी हसन मिराज, तोव्हीद ह्रिदोय, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम
हेही वाचा :