ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 PAK vs AFG : चेपॉकच्या टर्निंग पिचवर अफगाणच्या फिरकी 'त्रिकूटा'समोर पाकिस्तानच्या फलंदाजांची अग्निपरिक्षा - अफगाणिस्तान पाकिस्तान सामना न्यूज

Cricket World Cup 2023 PAK vs AFG : विश्वचषक 2023 चा 22 वा सामना आज पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. जर पाकिस्ताननं हा सामना गमावला तर च्याच्यासाठी उपांत्य फेरीचा मार्ग थोडा कठीण होईल.

Cricket World Cup 2023 PAK vs AFG
Cricket World Cup 2023 PAK vs AFG
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 23, 2023, 11:42 AM IST

चेन्नई Cricket World Cup 2023 PAK vs AFG : विश्वचषकात आज पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात 22 वा सामना होणार आहे. हा सामना चेन्नईतील चेपॉक येथील एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. या खेळपट्टीवर नेहमीच फिरकीपटूंचं वर्चस्व राहिलंय. आजच्या सामन्यात इथल्या परिस्थितीत बदल होण्याची शक्यता नाही. नेहमीप्रमाणे फिरकीपटूंना या खेळपट्टीवरून चांगली मदत मिळू शकते. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात ज्या खेळपट्टीवर सामना झाला त्याच खेळपट्टीवर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे संघ भिडतील. त्या सामन्यात टीम इंडियानं आपल्या प्लेइंग-11 मध्ये तीन फिरकीपटूंना स्थान दिले होते. तर भारताच्या फिरकी त्रिकुटाने ऑस्ट्रेलियन फलंदाजी उद्ध्वस्त केली होती.

  • दोन्ही संघ विजयाच्या इराद्यानं मैदानात : पाकिस्तानला खूप प्रयत्न करूनही मागच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 69 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. तर दुसरीकडं अफगाणिस्तानला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. मात्र त्यांनी त्याआधी इंग्लंडला हरवून विश्वचषकात उसटफेर केलं होतं. आज दोन्ही संघ विजयाच्या इराद्यानं मैदानात उतरतील.

हेड टु हेड रेकॉर्ड काय : अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यांबद्दल बोलायचं झाले तर, दोघांनी आतापर्यंत एकमेकांविरुद्ध 7 सामने खेळले आहेत. त्यापैकी पाकिस्ताननं आतापर्यंतचे सर्व 7 सामने जिंकले आहेत. आजचा सामना जिंकून अफगाणिस्तान संघाला हा नकोसा विक्रम मोडायला आवडेल. दोन्ही संघांमधील पहिला सामना 10 फेब्रुवारी 2012 रोजी तर शेवटचा सामना 26 ऑगस्ट 2023 रोजी खेळला गेला होता.

अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान संभाव्य प्लेइंग इलेव्हन :

  • पाकिस्तान : इमाम उल हक, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, हसन अली, उसामा मीर, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ
  • अफगाणिस्तान : रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झादरान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक

हेही वाचा :

  1. Cricket World Cup 2023 IND vs NZ : विराटनं विक्रमी खेळी करुनंही सोशल मिडियावर ट्रोल, चाहत्यांना राग अनावर; नेमकं घडलं तरी काय?
  2. Cricket World Cup २०२३ : भारतानं रोखला न्यूझीलंडचा 'विजय'रथ; कोहलीचं शतक हुकलं, शमीच्या ५ विकेट्स
  3. Cricket World Cup २०२३ : ऑस्ट्रेलियाचं वर्ल्डकपमध्ये दमदार पुनरागमन, पाकिस्तानला ६२ धावांनी हरवलं

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.