ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 : पावसाचा व्यत्यय आलेल्या सामन्यात पाकिस्तानचा विजय, उपांत्य फेरीच्या आशा कायम - पाकिस्तान

Cricket World Cup 2023 : विश्वचषकात आज झालेल्या सामन्यात पाकिस्ताननं न्यूझीलंडवर डकवर्थ लुईस नियमांच्या आधारे २१ धावांनी विजय मिळवला. ८१ चेंडूत नाबाद १२६ धावा ठोकणाऱ्या फखर जमानला सामनावीर घोषित करण्यात आलं.

Cricket World Cup 2023 NZ vs PAK
Cricket World Cup 2023 NZ vs PAK
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 4, 2023, 10:51 AM IST

Updated : Nov 4, 2023, 8:10 PM IST

बेंगळुरू Cricket World Cup 2023 : क्रिकेट विश्वचषकाचा ३५ वा सामना आज पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झाला. हा सामना या दोन्ही संघांसाठी बाद फेरीसारखाच होता. पावसाचा व्यत्यय आल्यानंतर या सामन्यात पाकिस्ताननं न्यूझीलंडचा डकवर्थ लुईस नियमांच्या आधारे २१ धावांनी पराभव केला. या विजयासह पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या आशा अजूनही जिवंत आहेत.

न्यूझीलंडनं रचला धावांचा डोंगर : पाकिस्तान संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विल्यमसनचं पुनरागमन झालं. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रविंद्र यांनी ६८ धावांची भागिदारी केली. कॉनवे ३५ धावा करून बाद झाला. त्यानंतर रविंद्रन विल्यमसनच्या मदतीनं सामन्याची सूत्र आपल्या हाती घेतली. रविंद्रनं विश्वचषकातील आपलं आणखी एक शतक ठोकलं. तो १०८ धावा करून परतला. दुसऱ्या टोकावर विल्यमसननं धडाकेबाज फलंदाजी केली. त्यानं ७९ चेंडूत ९५ धावांचं योगदान दिलं. या दोघांच्या फलंदाजीच्या बळावर न्यूझीलंडनं निर्धारित ५० षटकात ६ गडी गमावून ४०१ धावांचा डोंगर रचला. पाकिस्तानकडून मोहम्मद वसीम जूनियरनं ६० धावा देत ३ बळी घेतले.

फखर जमानचं शानदार शतक : न्यूझीलंडनं दिलेल्या ४०२ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. सलामीवीर अब्दुल्ला शफीक अवघ्या ४ धावांवर तंबूत परतला. मात्र त्यानंतर फखर जमान आणि कर्णधार बाबर आझमनं तुफानी फलंदाजी केली. दुसऱ्या इनिंगमध्ये वारंवार पावसाचा व्यत्यय आला. त्यामुळे सामना बराच वेळ थांबवण्यात आला होता. शेवटी डकवर्थ लुईस नियमांच्या आधारे पाकिस्तानला विजयी घोषित करण्यात आलं. तेव्हा पाकिस्तानच्या २५.३ षटकांत २०० धावा झाल्या होत्या. पाकिस्तानकडून सलामीवीर फखर जमाननं शानदार शतक ठोकलं. तो ८१ चेंडूत १२६ धावा करून नाबाद राहिला. तर बाबरनं ६३ चेंडूत नाबाद ६६ धावा केल्या. फखर जमानला सामनावीर घोषित करण्यात आलं.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :

  • पाकिस्तान : अब्दुल्ला शफीक, फखर जमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), इफ्तिखार अहमद, सौद शकील, आगा सलमान, शाहीन आफ्रिदी, हसन अली, मोहम्मद वसीम जूनियर, हरिस रौफ
  • न्यूझीलंड : डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साऊदी, ट्रेंट बोल्ट

हेही वाचा :

  1. Cricket World Cup 2023 : दुखापतग्रस्त हार्दिकला विश्वचषकातून निरोप; हा 'प्रसिद्ध' खेळाडू घेणार जागा
  2. Cricket World Cup 2023 ENG vs AUS : प्रतिष्ठेसाठी गतविजेते तर उपांत्य फेरीसाठी ऑस्ट्रेलिया मैदानात
  3. Cricket World Cup 2023 : अफगाणिस्तानचा नेदरलॅंडवर शानदार विजय, उपांत्य फेरीच्या आशा जिवंत

Last Updated : Nov 4, 2023, 8:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.