ETV Bharat / sports

Cricket World Cup २०२३ : बांग्ला टायगर्सचा लाजिरवाणा पराभव, नेदरलँडनं एकतर्फी सामना जिंकला - World Cup 2023

Cricket World Cup २०२३ : विश्वचषकात आज झालेल्या सामन्यात नेदरलॅंडनं बांग्लादेशचा ८७ धावांनी दणदणीत पराभव करत आणखी एक उलटफेर केला. प्रथम फलंदाजी करताना नेदरलॅंडनं ५० षटकांत सर्वबाद २२९ केल्या. प्रत्युत्तरात बांग्लादेशचा संघ ४२.२ षटकांत १४२ धावांवर ऑलआऊट झाला. ४ बळी घेणारा नेदरलॅंडचा पॉल व्हॅन मीकरेन सामनावीर ठरला.

Cricket World Cup 2023 NED vs BAN
Cricket World Cup 2023 NED vs BAN
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 28, 2023, 1:55 PM IST

Updated : Oct 28, 2023, 10:25 PM IST

कोलकाता Cricket World Cup २०२३ : क्रिकेट विश्वचषकातील आजचा २८ वा सामना नेदरलँड विरुद्ध बांग्लादेश यांच्यात झाला. कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावर हा सामना खेळला गेला. नेदरलँडनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

स्कॉट एडवर्ड्सनं एकाकी किल्ला लढवला : प्रथम फलंदाजी करताना नेदरलॅंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर विक्रमजीत सिंग आणि मॅक्स ओडोड अनुक्रमे ३ आणि ० धावांवर बाद झाले. मात्र त्यानंतर आलेल्या वेस्ली बॅरेसीनं ४१ चेंडूत ४१ धावा करत पडझड रोखली. नेदरलॅंडकडून कर्णधार स्कॉट एडवर्ड्सनं एकाकी किल्ला लढवला. त्यानं ८९ चेंडूत ६८ धावांचं योगदान दिलं. नेदरलॅंडनं ५० षटकांत सर्व गडी गमावून २२९ धावा केल्या. बांग्लादेशकडून मुस्तफिजुर रहमाननं ३६ धावा देऊन २ बळी घेतले.

पॉल व्हॅन मीकरेनचे ४ बळी : धावांचा पाठलाग करताना बांग्लादेशला सुरुवातीलाच झटका बसला. फॉर्ममध्ये असलेला लिट्टन दास १२ चेंडूत ३ धावा करून बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला मेहंदी हसन मिराजनं ४० चेंडूत ३५ धावा केल्या. मात्र त्यानंतर बांग्लादेशचा मिडल ऑर्डर ढेपाळला. अशाप्रकारे पूर्ण संघ ४२.२ षटकांत १४२ धावांवर ऑलसआऊट झाला. नेदरलॅंडच्या पॉल व्हॅन मीकरेननं बांग्लादेशी फलंदाजीचं कंबरडंच मोडलं. त्यानं २३ धावा देत ४ गडी बाद केले.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :

बांग्लादेश : तनझिद हसन, लिट्टन दास, नजमुल हुसेन शांतो, शाकीब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्ला, मेहंदी हसन मिराझ, महेंदी हसन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम

नेदरलँड्स : विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडोड, वेस्ली बॅरेसी, कॉलिन अकरमन, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार/विकेटकीपर), बास डी लीडे, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, लोगन व्हॅन बीक, शरीझ अहमद, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन

हेही वाचा :

  1. Cricket World Cup २०२३ : लखनऊचं मैदान फिरकीपटूंसाठी अनुकूल, अश्विनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल का?
  2. Babar Azam Security : कोलकात्यात बाबर आझमसाठी अभूतपूर्व सुरक्षा! ईडन गार्डन्सवरही तैनात असतील पोलीस
  3. Cricket World Cup २०२३ : पाकिस्तान विश्वचषकातून बाहेर होण्याच्या वाटेवर, रोमांचक सामन्यात द. आफ्रिकेनं केला पराभव

Last Updated : Oct 28, 2023, 10:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.