बंगळुरू Cricket world cup 2023 IND vs NED : यंदाच्या क्रिकेट विश्वचषकातील शेवटचा साखळी सामना रविवारी भारत विरुद्ध नेदरलँड्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात एक विलक्षण नजारा पाहायला मिळाला. जेव्हा भारतीय कर्णधार रोहित शर्मानं प्रेक्षकांची मागणी पूर्ण केली. खरं तर गेल्या अनेक सामन्यांपासून प्रेक्षक रोहित शर्माला विराट कोहलीला गोलंदाजी देण्याची मागणी करत होते. प्रेक्षकांनी नेदरलँडविरुद्ध अशी मागणी करायला सुरुवात केली तेव्हा रोहितनं प्रेक्षकांची मागणी पूर्ण करत विराटला गोलंदाजी दिली.
गोलंदाजीत नऊ वर्षांनंतर घेतली एक विकेट : प्रेक्षकांच्या मागणीनुसार भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली गोलंदाजी करायला आला. इतकंच नाही तर दुसऱ्या षटकात त्यानं एक विकेटही घेतली. यानंतर कोहलीचं सेलिब्रेशन पाहण्यासारखं होतं. कोहलीनं विकेट घेताच अनुष्का शर्मानंही जल्लोष केला. कोहलीनंतर प्रेक्षकांनी रोहित शर्माला शुभमन गिलला गोलंदाजी देण्याची मागणी सुरू केली. यानंतर शुभमन गिलदेखील गोलंदाजीसाठी आला. त्यानं दोन षटकं गोलंदाजी केली. इतकंच नाही तर त्यानंतर सूर्य कुमार यादवनंही गोलंदाजीत हात आजमावला आणि 2 षटकं टाकली. मात्र, दुसऱ्याच षटकात त्याला लागोपाठ दोन षटकार खावे सागले. प्रेक्षक इथंच थांबले नाहीत ते रोहितकडेही गोलंदाजीची मागणी करू लागले. मग प्रेक्षकांच्या मागणीनुसार कर्णधार रोहित शर्माही शेवटच्या विकेटसाठी गोलंदाजी करायला आला. त्यानं नेदरलँडची शेवटची विकेट काढून संघाला विजयाकडं नेलं.
-
🚨 VIRAT KOHLI STRIKES 🚨
— BCCI (@BCCI) November 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Right arm quick impact in Bengaluru 😎
KL Rahul with another fine catch!#TeamIndia | #CWC23 | #MenInBlue | #INDvNED pic.twitter.com/1Mir0kq2fq
">🚨 VIRAT KOHLI STRIKES 🚨
— BCCI (@BCCI) November 12, 2023
Right arm quick impact in Bengaluru 😎
KL Rahul with another fine catch!#TeamIndia | #CWC23 | #MenInBlue | #INDvNED pic.twitter.com/1Mir0kq2fq🚨 VIRAT KOHLI STRIKES 🚨
— BCCI (@BCCI) November 12, 2023
Right arm quick impact in Bengaluru 😎
KL Rahul with another fine catch!#TeamIndia | #CWC23 | #MenInBlue | #INDvNED pic.twitter.com/1Mir0kq2fq
भारतीय संघ अपराजित : भारतीय संघानं यंदाच्या विश्वचषकाचा शेवटचा साखळी सामना रविवारी खेळला. यात भारतानं एकहाती विजयही मिळवला. याआधी भारतीय संघानं आठपैकी 8 सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. आता भारतीय संघानं 9 पैकी 9 सामने जिंकून एक नवा विक्रम केला आहे. भारतीय संघाचा उपांत्य सामना 15 नोव्हेंबरला न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. तर दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. उपांत्य फेरीतील विजयी संघ 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना खेळतील.
हेही वाचा :