ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 : पुन्हा एकदा दिसणार भारत विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य सामन्याचा थरार! टीम इंडिया मँचेस्टरचा बदला मुंबईत घेणार का? - Cricket World Cup

Cricket World Cup 2023 : या वर्षीप्रमाणे २०१९ मध्येही टीम इंडिया गुणतालिकेत अव्वल स्थानावर होती आणि न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर होता. २०१९ मध्येही विश्वचषकातील पहिला उपांत्य सामना या दोन संघांमध्येच खेळला गेला होता. त्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला होता. आता यावेळी टीम इंडिया २०१९ च्या पराभवाचा बदला घेणार का? जाणून घ्या दोन्ही संघाची एकमेकांविरुद्ध कशी कामगिरी राहिली आहे.

Cricket World Cup 2023
Cricket World Cup 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 14, 2023, 8:30 PM IST

हैदराबाद Cricket World Cup 2023 : इंग्लंडमध्ये २०१९ क्रिकेट विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मँचेस्टरमध्ये खेळला गेला. पावसाच्या व्यत्ययामुळे २ दिवस चाललेल्या या सामन्यात टीम इंडियानं न्यूझीलंडला अवघ्या २३९ धावांवर रोखलं. मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघ २२१ धावांवर गडगडला आणि भारतानं १८ धावांनी सामना गमावला. अशाप्रकारे विश्वचषक जिंकण्याचं भारताचं स्वप्न धुळीला मिळालं. चार वर्षांनंतर आता हे दोन्ही संघ पुन्हा एकदा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आमनेसामने आहेत. १५ नोव्हेंबरला मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे.

टेबल टॉपर टीम इंडिया : भारतानं या विश्वचषकात चमकदार कामगिरी केली आहे. टीम सर्व ९ लीग सामने जिंकून १८ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी राहिली. दुसरीकडे, विश्वचषकात चांगली सुरुवात करणारी न्यूझीलंडची टीम मध्ये गडबडली. मात्र शेवटी त्यांनी चौथ्या स्थानी राहून उपांत्य फेरी गाठली. त्यांनी ९ पैकी ५ सामने जिंकले. २०१९ च्या विश्वचषकात देखील टीम इंडिया टेबल टॉपर होती. तेव्हा टीमनं ९ पैकी ७ सामने जिंकत १५ गुणांसह सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. २०१९ मध्ये न्यूझीलंड देखील चौथ्या स्थानावर होता. त्यांनी ९ पैकी ५ सामने जिंकले होते. मनोरंजक बाब म्हणजे, २०१९ आणि २०२३ या दोन्ही विश्वचषकांमध्ये, पाकिस्तान ५ व्या स्थानावर राहिला आणि दोन्ही वेळेस न्यूझीलंड संघाचं उपांत्य फेरीचं तिकीट पाकिस्तानच्या कामगिरीवर अवलंबून होतं!

वर्ल्ड कपमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड : वर्ल्ड कपमध्ये हे दोन संघ आतापर्यंत १० वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी भारतीय संघानं ४ वेळा तर न्यूझीलंड संघानं ५ वेळा विजय मिळवलाय. २०१९ च्या विश्वचषकात दोन संघांमधील साखळी सामना पावसामुळे वाहून गेला होता. तसं पाहता या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियानं आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. साखळी सामन्यात भारतीय संघान न्यूझीलंडचा ४ गडी राखून पराभव केला होता.

सर्वोच्च आणि सर्वात कमी धावसंख्या : विश्वचषकात न्यूझीलंडची भारताविरुद्ध सर्वाधिक धावसंख्या २७३ आहे. तो सामना टीम इंडियानं २७४ धावा करून जिंकला. धर्मशाला येथे चालू विश्वचषकातच हा सामना खेळला गेला. विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाची सर्वात कमी धावसंख्या १८२ आहे. तर भारताविरुद्ध किवींची सर्वात कमी धावसंख्या १४६ आहे.

वानखेडेवर दोन्ही संघांची कामगिरी : आता १५ नोव्हेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंड आणि भारत यांच्यात उपांत्य सामना रंगणार आहे. या मैदानावर दोन्ही संघांची कामगिरी चांगली राहिली आहे. भारतानं येथे खेळलेल्या २१ सामन्यांपैकी १२ जिंकले आणि ९ गमावले, तर न्यूझीलंडनं खेळलेल्या ३ सामन्यांपैकी २ सामने जिंकले. या मैदानावर टीम इंडियानं प्रथम फलंदाजी करत ५ सामने जिंकले आहेत, तर ७ सामने धावांचा पाठलाग करून जिंकले आहेत. या मैदानावर भारतीय संघाची सर्वोत्तम धावसंख्या ३५७ आहे. तर न्यूझीलंड संघाची सर्वोत्तम धावसंख्या ३५८ धावा आहे. येथे टीम इंडियाची सर्वात कमी धावसंख्या १६५ आणि न्यूझीलंडची १५३ आहे.

एकदिवसीय सामन्यांमध्ये कोणाचा वरचष्मा आहे : भारत आणि न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत एकूण ११७ एकदिवसीय सामने खेळले गेलेत. यापैकी भारतीय संघानं ५९ सामने जिंकले, तर न्यूझीलंडनं ५० सामन्यात विजय मिळवला आहे. दोन्ही संघांमधील एक वनडे सामना टाय झाला तर ७ सामने रद्द करण्यात आले.

हेही वाचा :

  1. Pravin Amre : श्रेयस अय्यर भविष्यात टीम इंडियाचं नेतृत्व करू शकतो का? कोच प्रवीण आमरे यांनी ETV Bharat ला दिलं उत्तर
  2. Hotel Rate In Mumbai : भारत-न्यूझीलंड सामन्यापूर्वी मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्सचे दर गगनाला!
  3. World Cup 2023 : भारत आणि न्यूझीलंड दरम्यान उपांत्यपूर्व सामन्याचा रंगणार थरार; चार वर्षानंतरही 'हे' करणार 'पंचगिरी'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.