बंगरुळू- Cricket World Cup 2023 IND vs NED : विश्वचषकात आज राऊंड रॉबिन स्टेजचा 45 वा आणि शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारत आणि नेदरलँड्स आमनेसामने असणार आहेत. भारतीय संघानं यापुर्वीच अंतिम-4 मध्ये प्रवेश केलाय. अशा स्थितीत हा सामना त्यांच्यासाठी उपांत्य फेरीचा सराव असेल. त्यामुळं या सामन्यात भारतीय संघ सतत खेळणाऱ्या त्यांच्या एक किंवा दोन गोलंदाजांना विश्रांती देण्याची शक्यता आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीत पात्र होण्यासाठी नेदरलँडसाठी महत्त्वाचा सामना : दुसरीकडं, नेदरलँडचा संघ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतून आधीच बाहेर पडलाय. त्यामुळं त्यांच्यासाठी हा सामना 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरण्याचा शेवटचा मार्ग आहे. हा सामना जिंकल्यास बांगलादेशचा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीचा मार्ग अवघड ठरु शकतो. या विश्वचषकातील पाकिस्तान व्यतिरिक्त टॉप-7 संघांना चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये खेळण्याची संधी मिळेल. यजमानपद असल्यानं पाकिस्ताननं या स्पर्धेत आधीच प्रवेश केलाय. सध्या गुणतालिकेत नेदरलँड्स शेवटच्या स्थानावर आहे. अशा स्थितीत त्यांना आजचा सामना कोणत्याही किंमतीवर जिंकावाच लागेल.
-
Can India remain unbeaten in the group stages or will the Netherlands spring one more surprise at #CWC23? 👀#INDvNED pic.twitter.com/EnRZhedi7T
— ICC (@ICC) November 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Can India remain unbeaten in the group stages or will the Netherlands spring one more surprise at #CWC23? 👀#INDvNED pic.twitter.com/EnRZhedi7T
— ICC (@ICC) November 12, 2023Can India remain unbeaten in the group stages or will the Netherlands spring one more surprise at #CWC23? 👀#INDvNED pic.twitter.com/EnRZhedi7T
— ICC (@ICC) November 12, 2023
- हेड टू हेड रेकॉर्ड : भारत आणि नेदरलँडचे संघ एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत दोनदा आमनेसामने आले आहेत. म्हणजेच आज ते तिसऱ्यांदा वनडेत आमनेसामने असतील. भारतीय संघ नेदरलँड्सविरुद्ध खेळलेले दोन एकदिवसीय सामने केवळ विश्वचषकात खेळले गेले आहेत. 2003 आणि 2011 च्या विश्वचषात भारतीय संघाचा सामना नेदरलँडशी झाला होता दोन्ही सामन्यांत भारताचा विजय झाला होता.
दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन :
- भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के एल राहुल (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव/आर अश्विन, जसप्रीत बुमराह/प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
- नेदरलँड्स : मॅक्स ओ'डॉड, वेस्ली बरासी, कॉलिन एकरमन, सिब्रांड एंजेलब्रेक्ट, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार/ यष्टिरक्षक), बास डी लीडे, तेजा नदामानुरु, लोगान व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन
हेही वाचा :