अहमदाबाद Cricket World Cup 2023 IND vs AUS Final : आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाचा आता अंतिम टप्पा आलाय. या विश्वचषकात भारतीय संघाचा प्रवास सर्वात नेत्रदीपक ठरलाय. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाला आतापर्यंत कोणीही पराभूत करु शकलेलं नाही. भारतीय संघानं 9 पैकी 9 साखळी सामने जिंकून 18 गुणांसह पहिल्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य फेरीत त्यांनी न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करुन अंतिम सामन्यात आपलं स्थान पक्कं केलंय. भारतीय संघाची ही चौथी अंतिम फेरी आहे. भारतीय संघानं दोनदा फायनल जिंकली आहे. यापुर्वी भारतीय संघानं 1983, 2003 आणि 2011 च्या विश्वचषकात अंतिम फेरी गाठली होती. त्यात 1983 आणि 2011 साली भारत विश्वविजेता ठरलाय.
-
And then there were two 🇮🇳 🇦🇺
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) November 16, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Presenting the #CWC23 finalists 🤩 pic.twitter.com/2FZmIXb3TG
">And then there were two 🇮🇳 🇦🇺
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) November 16, 2023
Presenting the #CWC23 finalists 🤩 pic.twitter.com/2FZmIXb3TGAnd then there were two 🇮🇳 🇦🇺
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) November 16, 2023
Presenting the #CWC23 finalists 🤩 pic.twitter.com/2FZmIXb3TG
ऑस्ट्रेलिया आठव्यांदा अंतिम फेरीत : या विश्वचषकात ऑस्ट्रेलियन संघाचा प्रवास चढ-उतारांचा राहिलाय. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघानं 9 पैकी 7 साखळी सामने जिंकले. 2 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियानं 14 गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात त्यांनी कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेचा 3 गडी राखून पराभव करुन त्यांना अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर काढत अंतिम फेरीत प्रवेश केला. ऑस्ट्रेलियाची ही आठवी अंतिम फेरी आहे. यापैकी त्यांनी विक्रमी म्हणजे पाचवेळा अंतिम सामना जिंकलाय. कांगारुंनी 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 मध्ये विश्वचषक जिंकलाय.
दोन्ही संघांच्या अंतिम फेरीचा इतिहास काय : एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फक्त एकदाच अंतिम सामना खेळला गेलाय. 2003 मध्ये पहिल्यांदा या दोन संघांमध्ये अंतिम सामना झाला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं आपल्या 50 षटकांत 2 गडी गमावून 359 धावा केल्या. 360 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव 39.2 षटकांत सर्वबाद 234 धावांवर आटोपला. यासह 2003 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतीय संघाचा 125 धावांनी पराभव केला होता. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील वांडरर्स स्टेडियमवर हा सामना खेळला गेला.
- 2003 चा बदला घेण्याच्या प्रयत्नात भारतीय संघ : यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघ ज्या लयीत आहे, ते पाहता 19 नोव्हेंबरला भारतीय संघ 2003च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या दारुण पराभवाचा बदला घेईल, असं वाटतं. आता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडिया भारताला विजय मिळो, अशी प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे.
हेही वाचा :
- ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिकेवर ३ गडी राखून विजय, भारताशी अंतिम सामन्यात गाठ
- Cricket World Cup 2023 AUS vs SA Semifinal : ऑस्ट्रलिया की दक्षिण आफ्रिका? दुसऱ्या उपांत्य सामन्यात कोलकाताच्या 'ईडन'वर कोणाचं 'दिल' होणार 'गार्डन'
- IND vs NZ Semifinal Records : वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघानं 'बुलेट ट्रेन'च्या वेगानं मोडले 'हे' विक्रम, आता वर्ल्ड कप राहणार लक्ष्य