नवी दिल्ली Cricket World Cup २०२३ : भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीसाठी बुधवारचा दिवस अत्यंत खास असेल. बुधवारी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर भारताचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. या सामन्यामध्ये सर्वांच्या नजरा विराट कोहलीकडे असतील. याला कारणही तसंच आहे. हे कोहलीचं घरचं मैदान असल्यानं तेथे उत्तम कामगिरी करण्यास तो उत्सुक असेल.
-
They both got #TeamIndia the first win of #CWC23 💪
— BCCI (@BCCI) October 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
As the bandwagon moves to Delhi, here's @imVkohli & @klrahul dissecting their match-winning partnership against Australia 👌
P.S. The local lad is bracing himself for his homecoming 🏟️
Watch the full interview 🎥 👇… pic.twitter.com/HSXYovY43T
">They both got #TeamIndia the first win of #CWC23 💪
— BCCI (@BCCI) October 9, 2023
As the bandwagon moves to Delhi, here's @imVkohli & @klrahul dissecting their match-winning partnership against Australia 👌
P.S. The local lad is bracing himself for his homecoming 🏟️
Watch the full interview 🎥 👇… pic.twitter.com/HSXYovY43TThey both got #TeamIndia the first win of #CWC23 💪
— BCCI (@BCCI) October 9, 2023
As the bandwagon moves to Delhi, here's @imVkohli & @klrahul dissecting their match-winning partnership against Australia 👌
P.S. The local lad is bracing himself for his homecoming 🏟️
Watch the full interview 🎥 👇… pic.twitter.com/HSXYovY43T
विराट कोहली फॉर्ममध्ये : दिल्लीचं अरुण जेटली स्टेडियम पूर्वी फिरोजशाह कोटला नावानं ओळखलं जायचं. या मैदानावर विराट भरपूर क्रिकेट खेळला आहे. त्यामुळे त्याला येथील विकेटची चांगली ओळख आहे. या विश्वचषकातील पहिल्या सामन्यात विराट कोहली फॉर्ममध्ये दिसला. रविवारी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर विराटनं पाच वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८५ धावांची संयमी खेळी केली होती. विराटनं केएल राहुलसोबत केलेल्या भागिदारीच्या बळावर भारतानं हा सामना ६ गडी राखून जिंकला. आता अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट आपला हा फॉर्म कायम राखण्याचा प्रयत्न करेल.
प्लेइंग इलेव्हन खेळपट्टीवर अवलंबून असेल : विकेटकीपर केएल राहुलनंही पहिल्या सामन्यात आपल्या फलंदाजीची चुणूक दाखवली होती. त्यानं नाबाद ९७ धावांची खेळी करून संघाच्या विजयात महत्वाचं योगदान दिलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात आघाडीचे फलंदाज वगळता भारताच्या सर्व खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली. चेन्नईची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अनुकूल होती. त्यामुळे येथे भारतानं तीन फिरकीपटू उतरवले. या तीनही फिरकीपटूंनी या सामन्यात शानदार गोलंदाजी केली. मात्र आगामी सामन्यांमध्ये पुन्हा तीन फिरकीपटूंना एकत्र संधी मिळणं अवघड आहे. कर्णधार रोहित शर्मानं सूचित केल्याप्रमाणे, टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन खेळपट्टीवर अवलंबून असेल.
गोलंदाजांकडून पुन्हा अपेक्षा : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा, सलामीवीर इशान किशन आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येणारा श्रेयस अय्यर सपशेल अपयशी ठरले होते. आता अफगाणिस्तानविरुद्ध ते आपलं अपयश मागे सोडून चांगली कामगिरी करण्यास उत्सुक असतील. भारतीय गोलंदाजांनी चेन्नईमध्ये क्लिनिकल परफॉरमन्स दिला होता. त्यांनी ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य टीमला अवघ्या १९९ धावांवर रोखलं होतं. आता दिल्लीत ते याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करतील.
रविंद्र जडेजा हुकमी एक्का : यजमानांसाठी ऑस्टेलियाविरुद्ध तीन विकेट घेणारा डावखुरा फिरकी गोलंदाज रविंद्र जडेजा हुकमी एक्का असेल. तर अफगाणिस्तानसाठी प्रमुख फिरकी गोलंदाज राशिद खानची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. भारत ही मॅच जिंकण्यासाठी फेव्हरेट आहे. मात्र अफगाणिस्तानच्या संघाकडे मोठमोठ्या संघांना धक्का देण्याची क्षमता असल्यानं हा सामना रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा :
- Cricket World Cup २०२३ : आगामी सामन्यांमध्ये प्लेइंग ११ निवडणं भारतासाठी सोपं नाही, अश्विनला संधी मिळेल का?
- Cricket World Cup 2023 : 'भावानं सर्वोत्तम कामगिरी करून विश्वचषक द्यावा'; रविंद्र जडेजाच्या बहिणीची 'ETV भारत'शी खास बातचीत
- Cricket World Cup २०२३ : 'आमचे फलंदाज अपयशी ठरले', भारताविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर स्टीव्ह स्मिथची कबुली