हैदराबाद Cricket World Cup 2023 : क्रिकेट विश्वचषकातील ३७ वा सामना रविवारी कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जाणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी तिकिटांचा काळाबाजार झाल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी 'बुक माय शो' या ऑनलाइन पोर्टलचं नाव समोर आलंय. यानंतर कोलकाता पोलिसांनी बंगाल क्रिकेट असोसिएशन (CAB) आणि 'बुक माय शो'च्या अधिकाऱ्यांना समन्स बजावलं.
'बुक माय शो'च्या अधिकाऱ्यांची चौकशी : कोलकाता पोलिसांच्या अँटी राऊडी पथकानं या प्रकरणाचा वेगानं तपास सुरू केला आहे. कोलकाता पोलीस मुख्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, 'बुक माय शो'च्या अनेक अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणात तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या ७ जणांना विविध ठिकाणांहून अटक करण्यात आली. आता विश्वचषकाची तिकिटं ऑनलाइन कोणी खरेदी केली आणि या तिकिटांचा काळाबाजार कसा सुरू केला, याचा शोध अधिकारी घेत आहेत.
सौरव गांगुलीच्या भावाचंही नाव आलं : या प्रकरणी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा मोठा भाऊ आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष स्नेहशिष गंगोपाध्याय यांनाही नोटीस पाठवण्यात आलीये. या नोटीसमध्ये, एवढी तिकिटं कशी मिळाली आणि त्यांचा काळाबाजार कसा झाला, याबाबत उत्तरे मागविण्यात आली. यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यापूर्वीच क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालच्या (CAB) अडचणी वाढल्या आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण : क्रिकेट चाहत्यांनी बंगाल क्रिकेट असोसिएशन, बीसीसीआय आणि 'बुक माय शो' या ऑनलाइन पोर्टलवर तिकिटांचा काळाबाजार केल्याचा आरोप केला होता. मात्र असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी हे सर्व आरोप फेटाळले. चाहत्यांनी १५०० रुपयांची तिकिटं ११ ते १५ हजार रुपयांना विकल्याचा आरोप केला होता.
हेही वाचा :