हैदराबाद ICC World Cup 2023 : भारतानं नेहमीच मोठ्या अपेक्षांसह विश्वचषकात प्रवेश केलाय. कारण भारताचं क्रिकेटबद्दल प्रेम सर्वांना परिचित आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं ICC स्पर्धांमध्ये भारताला विश्वविजेतेपदापर्यंत नेत अभूतपूर्व यश मिळवून दिलं होतं. तथापि, 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर भारत आयसीसी ट्रॉफीमध्ये विजय मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे. भारत सातत्यानं प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवतो मात्र, महत्त्वाच्या प्रसंगी भारताला पराभूत व्हावं लागतंय.
भारताकडं विश्वचषक जिंकण्याची संधी : यावेळी भारताकडं विश्वचषक जिंकण्याची चांगली संधी आहे. भारतातच विश्वकप सामने होत असल्यानं त्याचा फायदा भारतीय गोलंदाजाना होऊ शकतो. भारताकडं मजबूत गोलंदाजासह, दर्जेदार फलंदाजांचा संघ आहे. त्यामुळं भारतीय संघाला मायभूमीवर यश मिळवणं सहज शक्य आहे. मात्र भारतासमोर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान सारख्या संघाचं अव्हान आहे. त्यामुळं विश्वकप जिकंण्याची लढाई म्हणावी तेवढी सोपी दिसत नाही. तरी देखील भारतीस संघाचा विश्वास पाहता संघ विश्वकपला गवासणी घालेले असं क्रिकेट प्रेमींना वाटतंय.
भारताची फलंदाजी मजबूत : जबरदस्त फॉर्मच्या जोरावर भारत विश्वकप स्पर्धेत उतरत आहे. भारतानं आगोदरच आशिया कप 2023 जिंकलाय. भारतानं एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाला 2-1 नं पराभूत करत अशिया कपवर नाव कोरलंय. भारताची फलंदाजी संघाची सर्वात मोठी ताकद असणार आहे. कारण खेळपट्ट्या फलंदाजांना धावा करण्यास मदत करतील. कर्णधार रोहित शर्मानं खेळलेल्या शेवटच्या चार एकदिवसीय सामन्यात तीन अर्धशतकं झळकावली आहेत. त्याच्यासोबतच दिग्गज फलंदाज विराट कोहलीनं उत्कृष्ट कामगिरी दाखवली आहे, तर युवा खेळाडू शुभमन गिलनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ताज्या मालिकेत 50+ धावा करत आशिया चषकात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू झाला. केएल राहुल, श्रेयस अय्यर यांनी देखील चांगली खेळी केली. यावरुन भारताची फलंदाजी मजबूत असल्याचं दिसतंय.
भारतीय गोलंदाजीचा कहर : कुलदीप यादवनं विकेट घेण्याचा पराक्रम सुरू ठेवलाय, तसंच रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा या फिरकीपटूंची देखील संघाला मदत होणार आहे. मोहम्मद सिराजनं आशिया कप फायनलमध्ये कहर केलाय, तर मोहम्मद शमीनं ऑस्ट्रेलिया सामन्यात पाच विकेट घेतल्या होत्या. यावरुनच भारतीय संघ विश्वचषकाचा पक्का दावेदार मानला जातोय, मात्र संघातील काही चुका दुरूस्त करण्याची गरज आहे. अन्याथा विश्वचषकाला भारताला मुकावं लागू शकतं.
भारतीय संघाची कमजोरी : भारतीय संघातील बहुतेक फलंदाज उजव्या हाताचे आहेत. त्यामुळं भारतीय संघाकडं डावखुरा फलंदाजीचा पर्याय नसल्यामुळं इशान किशनला प्लेइंग इलेव्हनमधून वगळलं जाण्याची शक्यता आहे. इशानला बेंचिंग केल्यास, मेन इन ब्लू लेग-स्पिनर्सचा पर्याय भारत गमावू शकतो. तसेच केएल राहुल अर्धवेळ यष्टीरक्षक असल्यानं, फलंदाजांना बाद करण्याच्या शक्यतांवर परिणाम होऊ शकतो. तसंच, अष्टपैलू खेळाडूऐवजी शार्दुल ठाकूरला खालच्या क्रमानं खेळवूनल भारताचा विकेट वाचवण्यावर भर आहे. शार्दुलचा 44 एकदिवसीय सामन्यांत 6.24 चा इकॉनॉमी रेट आहे, जो फारसा चांगला रेट नाही. अशा परिस्थितीत मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज किंवा रविचंद्रन अश्विनसारख्या दर्जेदार गोलंदाजांना बाहेर बसावं लागण्याची शक्यता आहे.
संघात संयोजनाबाबत संभ्रम : अलीकडच्या काळात सातत्यानं होत असलेल्या बदलांमुळं भारतीय संघात संयोजनाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. संघाला मधल्या फळीत त्यांचा प्राधान्यक्रम ठरवावा लागणार आहे. चांगल्या फलंदाजीसाठी संघाला तीन स्पेशलिस्ट वेगवान गोलंदाज, तीन फिरकीरटू किंवा अष्टपैलू खेळाडूंची निवड करणावी लागणार आहे. आणखी एक गोष्ट आहे महत्वाची आहे ती म्हणजे, रोहित शर्मा सारखे खेळाडू सावधपणे खेळण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळं भारतीय खेळपट्यावर असं खेळण संघाला महागात पडू शकतं.
भारतासमोर 'या' संघाचं अव्हान : धावपट्यावर इंग्लंड, ऑस्ट्रेलियासारख्या आक्रमक फलंदाजांसह भारताला सर्वात मोठं आव्हान असेल. विरोधक याचा फायदा उचलण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं भारतीय फलंदाजांना अशा परिस्थितीत फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच, गेल्या काही वर्षांतील विश्वचषकाच्या बाद फेरीतील भारताची कामगिरी लक्षात घेता, धावफलकाचा दबाव न घेता संघाला पुढं जावं लागेल.
शुभमन गिलला चांगली संधी : शुभमन गिलकडं एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रभाव पाडण्यासाठी जागतिक स्तरावर झळकण्याची उत्तम संधी आहे. त्यानं 50 षटकांच्या फॉर्मेटमध्ये 72.35 च्या सुपर सरासरीनं 1 हजार 230 धावा केल्या आहेत. भारतीय क्रिकेटचा भविष्यातील स्टार म्हणून त्याच्याकडं पाहिले जातंय. शुभमन गिलला आपली क्षमता सिद्ध करण्याची यापेक्षा चांगली संधी असू शकत नाही.
इशान किशनची आक्रमक खेळी : इशान किशन हा आणखी एक युवा खेळाडू आहे. ज्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील झाल्यास त्याच्या फलंदाजीचं कौशल्य तसंच यष्टिरक्षण कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. तो त्याच्या आक्रमक खेळानं विरोधी संघाला धूळ चारू शकतो. मात्र, त्यानं अधिक संयम ठेवल्यास राष्ट्रीय संघासाठी तो एक महत्वपूर्ण खेळाडू बनू शकतो.
हेही वाचा -
- Cricket World Cup 2023 : भारतीय संघात विश्वकप जिंकण्याची क्षमता - चंचल भट्टाचार्य
- 2023 Cricket World Cup : अक्षर पटेलसाठी क्रिकेट विश्वचषकतील सुवर्ण संधी यावेळीही हुकली, भावाची भावनिक प्रतिक्रिया
- Cricket World Cup : १९७५ पासून २०१९ विश्वचषकातील कामगिरी; प्रत्येक विश्वचषकात टीम इंडियाची कामगिरी कशी होती? जाणून घ्या सोप्या शब्दात