हैदराबाद : सध्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकाचा ( ICC Women's ODI World Cup ) थरार न्यूझीलंडमध्ये सुरु आहे. या स्पर्धेत एकूण आठ संघाचा समावेश आहे. ज्यामध्ये यजमान न्यूझीलंड व्यतिरिक्त गतविजेता इंग्लंड, भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि बांगलादेशचे संघ या स्पर्धेत सहभागी आहेत. या स्पर्धेतील पंधरावा सामना भारत विरुद्ध इंग्लंड संघात पार पडला. या सामन्यात इंग्लंडने भारतावर 4 विकेट्स राखून मात केली. त्यानंतर आयसीसी महिला विश्वचषकाच्या गुणतालिकेत काहीस बदल झाला आहे.
स्पर्धेच्या राऊंड रॉबिन टप्प्यात ( Round robin stage ) एकूण 28 सामने खेळवले जातील. आठही संघ एकमेकांविरुद्ध एक एक सामना खेळणार आहेत. यापैकी अव्वल 4 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील, अंतिम सामना 3 एप्रिल रोजी क्राइस्टचर्च येथे खेळवला जाईल. तत्पुर्वी गुणतालिकेत काही बदल झाले आहेत. भारतीय संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमाकांवर आहे. भारतीय संघाचा इंग्लंड विरुद्ध पराभव झाल्याने त्यांच्याकडे 4 गुण आहेत. तसेच पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर अनुक्रमे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका आहेत.
आयसीसी महिला विश्वचषकाची गुणतालिका :
स्थान | टीम | मैच | जीत | हार | कोई परिणाम नहीं | अंक | नेट रन रेट |
1 | ऑस्ट्रेलिया | 4 | 4 | 0 | 0 | 8 | 1.744 |
2 | दक्षिण अफ्रिका | 3 | 3 | 0 | 0 | 6 | 0.280 |
3 | भारत | 4 | 2 | 2 | 0 | 4 | 0.632 |
4 | न्यूझीलंड | 4 | 2 | 2 | 0 | 4 | -0.257 |
5 | वेस्टइंडिज | 4 | 2 | 2 | 0 | 4 | -1.233 |
6 | इंग्लंड | 4 | 1 | 3 | 0 | 2 | 0.351 |
7 | बांग्लादेश | 3 | 1 | 2 | 0 | 2 | -0.477 |
8 | पाकिस्तान | 4 | 0 | 4 | 0 | 0 | -0.996 |
महिला विश्वचषकाच्या 15व्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा ( Defeat of Indian team ) सामना करावा लागला. इंग्लंडच्या महिला संघाने हा सामना 4 गडी राखून जिंकला. भारतीय संघाचा चार सामन्यांतील हा दुसरा पराभव आहे. यासोबतच सलग तीन पराभवानंतर गतविजेत्या इंग्लंडचा हा पहिला विजय आहे. इंग्लंड सध्या गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे.
प्रथम खेळताना भारतीय महिला संघ अवघ्या 134 धावांत आटोपला. स्मृती मंधानाने 35 आणि ऋचा घोषने 33 धावा केल्या. इंग्लंडकडून चार्लीडीनने चार विकेट घेतल्या. त्याचबरोबर इंग्लंडने 6 गडी गमावून लक्ष्य पूर्ण केले. ज्यामध्ये कर्णधार हीदर नाइट ( Captain Heather Knight ) 53 धावांवर नाबाद राहिली.