हैदराबाद : आयसीसी महिला टी-20 विश्वचषक ( ICC Women T20 World Cup ) स्पर्धेचे आयोजन 4 मार्च पासून केले जाणार आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्या अगोदरच महिला क्रिकेटपटूंसाठी मोठी आनंदाची बातमी ( Good news for women cricketers ) समोर आली आहे. आयसीसीने या स्पर्धेच्या विजेत्याला दिल्या जाणाऱ्या बक्षिसाची रक्कम दुप्पट केली आहे. न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या आगामी महिला विश्वचषकाच्या विजेत्या संघाला 13 लाख 20 हजार डॉलर्सचे बक्षीस म्हणून रक्कम मिळणार आहे. इंग्लंडमध्ये 2017 च्या विश्वचषक स्पर्धेत विजेत्या संघाला मिळालेल्या रकमेपेक्षा ही रक्कम दुप्पट आहे.
आयसीसी म्हणाले, स्पर्धेच्या एकूण बक्षिसाच्या रकमेत 75 टक्क्यांनी वाढ ( 75% increase WC prize money ) झाली आहे. 35 लाख डॉलरची बक्षीस रक्कम आठ संघांमध्ये वितरित केली जाईल, जी मागील स्पर्धेपेक्षा 15 लाख डॉलरने अधिक आहे. स्पर्धेतील उपविजेत्याला सहा लाख डॉलर्सचे बक्षीस रक्कम मिळेल, जे 2017 च्या उपविजेत्या भारताला मिळालेल्या रकमेपेक्षा दोन लाख 70 हजार डॉलरने जास्त आहे.
-
The overall prize money pot for the 2022 Women's @cricketworldcup in New Zealand has now been revealed!
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) February 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Details 👇https://t.co/Nol79nJBBs
">The overall prize money pot for the 2022 Women's @cricketworldcup in New Zealand has now been revealed!
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) February 15, 2022
Details 👇https://t.co/Nol79nJBBsThe overall prize money pot for the 2022 Women's @cricketworldcup in New Zealand has now been revealed!
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) February 15, 2022
Details 👇https://t.co/Nol79nJBBs
उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या दोन संघांना प्रत्येकी तीन लाख डॉलर्स मिळतील, तर गटा फेरीतून बाहेर पडणाऱ्या चार संघांना प्रत्येकी ७० हजार डॉलर्स मिळतील. जे मागील स्पर्धेच्या 30 हजार डॉलरच्या तुलनेत दुप्पट आहे. गट फेरी जिंकणाऱ्या प्रत्येक संघाला सात लाख डॉलर पैकी प्रत्येक विजयासाठी हजार डॉलर प्राप्त होतील. गेल्या विश्वचषकात भारताचा नऊ धावांनी पराभव करून चौथ्यांदा विजेतेपद मिळवणाऱ्या इंग्लंड संघाला सहा लाख साठ हजार डॉलर्सची रक्कम मिळाली होती.
यंदा होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत एकूण 28 साखळी सामने ( 28 series matches in World Cup ) खेळले जातील. जे राउंड रोबिन फॉरमॅट ( Round robin format ) मध्ये खेळले जातील. प्रत्येक संघाला एकदा एकमेकांविरुद्ध खेळण्याची संधी मिळेल. गुणतालिकेत अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. सामना जिंकल्यावर, विजेत्या संघाला दोन गुण मिळतील, तर सामना बरोबरीत सुटला किंवा निकाल न लागल्यास, दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल.
दरम्यान या स्पर्धेचे आयोजन सहा स्थळांवर केले जाईल. या स्पर्धेचा पहिला सामना न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज मध्ये 4 मार्चला माउंट मोनगानुईच्या बे ओवल येथे खेळला जाईल. या स्पर्धेचा अंतिम सामना 3 एप्रिलला क्राइस्टचर्च येथील हॅगली ओव्हल येथे होणार आहे.