ETV Bharat / sports

ICC Test and ODI Rankings: आयसीसीची कसोटी आणि वनडे क्रमवारी जाहीर; जडेजा पहिल्या स्थानावर कायम, तर 'या' खेळाडूंची घसरण - आयसीसी कसोटी क्रमवारी

बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय कर्णधार रोहित शर्मा ( Indian captain Rohit Sharma ) आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली ( Batsman Virat Kohli ) यांची प्रत्येकी एक स्थान घसरून अनुक्रमे आठव्या आणि 10व्या स्थानावर गेले आहेत.

Ravindra Jadeja
Ravindra Jadeja
author img

By

Published : Mar 30, 2022, 7:19 PM IST

दुबई: आयसीसीने बुधवारी पुरुष खेळाडूंची कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधील ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. ज्यामध्ये खुप मोठे बदल झाले आहेत. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू उस्मान ख्वाजा ( Cricketer Usman Khwaja ) याने पाकिस्तानविरुद्धच्या अलीकडेच संपलेल्या मालिकेत दमदार कामगिरी केली होती. त्याने बुधवारी ताज्या आयसीसी कसोटीतील फलंदाजी क्रमवारीत डेव्हिड वॉर्नर, विराट कोहली, ऋषभ पंत, रोहित शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांना मागे टाकले आहे. तसेच त्याने सहा स्थानांनी झेप घेतल सातवे स्थान काबीज केले आहे. त्यामुळे भारताचा रोहित शर्मा आणि कोहली एका स्थानाने घसरून अनुक्रमे आठव्या आणि 10व्या स्थानावर पोहोचले आहेत. त्याचबरोबर रिषभ पंत टॉप-10 मधून बाहेर पडलो असून आता तो अकराव्या स्थानावर आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ख्वाजा हा एक दमदार फलंदाज राहिला होता. त्याने पाच डावांत 165.33 च्या सरासरीने 496 धावा केल्या होत्या. या मालिकेत त्याची धावसंख्या 97, 160, नाबाद 44, 91 आणि नाबाद 104 होती. त्यानंतर त्याने वर्षाची सुरुवात सिडनी येथे नवीन वर्षाच्या अनिर्णित अॅशेस कसोटीत पाठोपाठ शतके करून केली आणि दोन वर्षांहून अधिक काळानंतर त्याचे फॉर्मेटमध्ये पुनरागमन झाले. पाकिस्तानचा अब्दुल्ला शफीक, जो 79.40 च्या सरासरीने 397 धावांसह मालिकेत दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता, तो 22 स्थानांनी झेप घेत पहिल्या 40 मध्ये पोहोचला आहे, तर मोहम्मद रिझवान आठ स्थानांनी घसरून 19 व्या स्थानावर आला आहे.

इंग्लंडचा कर्णधार जो रुट ( England captain Joe Root ) चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आणि न्यूझीलंडचा केन विल्यमसन ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लॅबुशेनच्या नंतर अनुक्रमे यादीत 2 आणि 3 क्रमांकावर आहेक. अष्टपैलू खेळाडूंमध्ये भारताचा रवींद्र जडेजा अव्वल स्थानावर कायम ( Ravindra Jadeja remains at the top ) आहे. तर रविचंद्रन अश्विनने वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरला दुसऱ्या क्रमांकावरून हटवले आहे. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू काईल मेयर्सने ग्रेनाडा येथील तिसर्‍या कसोटीत इंग्लंडविरुद्धच्या शानदार कामगिरीनंतर 29 स्थानांनी झेप घेत 11 वे स्थान पटकावले आहे.

गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्सच्या ( Test captain Pat Cummins ) नेतृत्वाखाली अश्विन आणि जसप्रीत बुमराह अनुक्रमे दुसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. तिसर्‍या कसोटीत 2/13 आणि 5/18 अशी कामगिरी करणारा मेयर्स 33 स्थानांवरुन 48 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीने न्यूझीलंडच्या काइल जेमिसनला मागे टाकून पाचवे स्थान काबीज केले आहे, तर ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने चार स्थानांनी झेप घेत 11 वे स्थान पटकावले आहे. कमिन्सने तिसर्‍या सामन्यात पाच विकेटसह तीन कसोटीत 12 विकेट्स घेत अव्वल फळीतील कसोटी गोलंदाज म्हणून आपले स्थान मजबूत केले आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये, अॅडम झाम्पाने गोलंदाजांच्या ताज्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल 10 मध्ये जाण्यासाठी सहा स्थानांनी झेप घेतली आहे.

बांगलादेशच्या शाकिब अल हसनने ( Shakib Al Hasan ) चार स्थानांनी झेप घेत 8व्या क्रमांकावर, तर देशबांधव तस्किन अहमदने 15 स्थानांची झेप घेत 33व्या क्रमांकावर पोहचला आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा आठव्या क्रमांकावरून 13व्या क्रमांकावर घसरला आहे. बांगलादेशचा तमीम इक्बाल फलंदाजी क्रमवारीत 20 व्या स्थानावर पोहोचला आहे, तर दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकने रोहित शर्माला मागे टाकून पाचव्या स्थानावर घसरला आहे. मंगळवारी, पाकिस्तानच्या इमाम-उल-हकच्या धडाकेबाज शतकामुळे त्याला पहिल्या 10 मध्ये परतण्यास मदत झाली. बाबर आझम, ट्रेंट बोल्ट आणि शकीब अनुक्रमे फलंदाजी, गोलंदाजी आणि अष्टपैलूंच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत.

हेही वाचा - IPL 2022 KKR vs RCB: कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आज आमनेसामने; आरसीबी पहिल्या विजयाच्या शोधात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.