मुंबई - आयसीसी टी-20 विश्व करंडक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय होल्टेज सामना कधी खेळला जाणार याची माहिती समोर आली आहे. दोन्ही संघातील हा सामना 24 ऑक्टोबर रोजी दुबईमध्ये खेळला जाणार आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे.
-
T20 WC: India to face arch-rivals Pakistan on October 24
— ANI Digital (@ani_digital) August 4, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/K0EJyVewpt#T20worldcup pic.twitter.com/bmg7mU3wvh
">T20 WC: India to face arch-rivals Pakistan on October 24
— ANI Digital (@ani_digital) August 4, 2021
Read @ANI Story | https://t.co/K0EJyVewpt#T20worldcup pic.twitter.com/bmg7mU3wvhT20 WC: India to face arch-rivals Pakistan on October 24
— ANI Digital (@ani_digital) August 4, 2021
Read @ANI Story | https://t.co/K0EJyVewpt#T20worldcup pic.twitter.com/bmg7mU3wvh
मागील महिन्यात आयसीसीने टी-20 विश्वकरंडक ओमान आणि युएईमध्ये खेळवण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. भारत या विश्वकरंडकाचे यजमानपद भूषवत आहे. ही स्पर्धा 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर यादरम्यान पार पडणार आहे.
टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी दोन गट करण्यात आले आहेत. यात भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी ग्रुप 2 मध्ये आहेत. 20 मार्च 2021 पर्यंतच्या टीम रॅकिंगनुसार हे गट पाडण्यात आले आहेत.
ग्रुप 1 मध्ये गतविजेता वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. तर ग्रुप 2 मध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान या संघाचा समावेश आहे. ग्रुप 1 आणि ग्रुप 2 मध्ये आणखी दोन संघ पात्रता फेरीतून निवडले जातील.
भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याची उत्सुकता
भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याला जगभरातील क्रिकेट चाहत्यांची पसंती मिळले. हा सामना कधी होणार याकडे संपूर्ण जगातील चाहत्यांचे लक्ष्य असते. टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना निश्चित होता. परंतु त्याची तारीख समोर आली नव्हती. आता एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने तारीख सांगितली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, उभय संघातील टी-20 सामना 24 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे.
हेही वाचा - Tokyo Olympic : भारताला तिसरं पदक; लवलिनाने जिंकलं कांस्य पदक
हेही वाचा - टोकियो ऑलिम्पिक 2020 : भारताचा नीरज चोप्रा अंतिम फेरीत; पुरुष भालाफेकमध्ये पहिल्या प्रयत्नात पात्र