ETV Bharat / sports

आयसीसी टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतील सामने 'या' नऊ स्टेडियममध्ये होणार - बीसीसीआय

सूत्रांच्या माहितीनुसार, टी-20 विश्वकरंडक सामन्यांसाठी बीसीसीआयने नऊ ठिकाणांची पाहणी केली असून, याचा अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडणार आहे. इतर सामन्यांसाठी दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद आणि धरमशाला या ठिकाणी असणाऱ्या स्टेडियमना पसंती देण्यात आली आहे.

icc-t20-world-cup-2021-bcci-picks-nine-venues-final-in-narendra-modi-cricket-stadium
आयसीसी टी-२० विश्वकरंडक स्पर्धेचे सामने 'या' नऊ स्टेडियममध्ये होणार
author img

By

Published : Apr 17, 2021, 3:22 PM IST

मुंबई - सप्टेंबर महिन्यात आयसीसी टी-२० विश्वकरंडक स्पर्धा भारतात होणार आहे. या स्पर्धेची तयारीला बीसीसीआयने सुरूवात केली आहे. बीसीसीआयच्या सर्वोच्च समितीची आज बैठक पार पडली. या बैठकीत स्पर्धेच्या ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार टी-२० विश्व करंडक सामन्यांसाठी बीसीसीआयने नऊ ठिकाणांची पाहणी केली असून याचा अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडणार आहे. इतर सामन्यांसाठी दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद आणि धरमशाला या ठिकाणी असणाऱ्या स्टेडियमना पसंती देण्यात आली आहे.

यावर्षी होणाऱ्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी चार नवी ठिकाणे निवडण्यात आली आहे. यात हैदराबाद, लखनौ, चेन्नई आणि अहमदाबादचा समावेश आहे. या स्टेडियमध्ये २०१६ मध्ये झालेल्या विश्व करंडक स्पर्धेची सामने आयोजित करण्यात आलेली नव्हती.

बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितलं की, 'आम्ही कोविड-१९ च्या प्रादुर्भामुळे उद्धभवलेल्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. ऑक्टोबर-नोव्हेबरपर्यंत ही परिस्थिती कशी राहिल हे सांगता येणार नाही. आयोजनाची वेळ जवळ आल्यानंतर कोविडची स्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाईल. परंतु, सद्यघडीला टी-२० विश्वकरंडाच्या तयारी सुरू राहिल.'

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावाचे आहेत. यामुळे पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला भारतामध्ये येण्यासाठी केंद्र सरकार व्हिसा देणार का? हा प्रश्न आयसीसीला पडला होता. शुक्रवारी झालेल्या बैठकीत पाकिस्तानी खेळाडू आणि मीडियाला व्हिसा देण्यासाठी भारत सरकार तयार झाल्याची माहिती बीसीसीआयने सचिव जय शाह यांनी आयसीसीला दिली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचा संघ आगामी टी-२० विश्व करंडक खेळण्यासाठी भारतात येणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे.

हेही वाचा - पाकिस्तानचा क्रिकेट संघ भारतात येणार, केंद्र सरकारने दिली परवानगी

हेही वाचा - IPL २०२१ : हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबईचे पारडं जड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.