चेन्नई ICC ODI World Cup 2023 India Vs Australia : क्रिकेट विश्वचषकात आज भारतानं आपल्या मोहिमेची सुरुवात केली. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर भारतासमोर पाच वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचं आव्हान होतं. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं ४९.३ षटकांत सर्वबाद १९९ धावा केल्या. भारतासमोर विजयासाठी २०० धावांचं आव्हान होतं. भारताकडून रविंद्र जडेजानं २८ धावा देत ३ विकेट घेतल्या. तर कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराहनं २-२ बळी घेतले. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव स्मिथनं ७१ चेंडूत सर्वाधिक ४६ धावा केल्या.
-
KL Rahul finishes off the chase with a MAXIMUM! 😎
— BCCI (@BCCI) October 8, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
He remains unbeaten on 97* & #TeamIndia start #CWC23 with a superb win against Australia 🙌
Scorecard ▶️ https://t.co/ToKaGif9ri#CWC23 | #INDvAUS | #TeamIndia | #MeninBlue pic.twitter.com/rZRXGei1QN
">KL Rahul finishes off the chase with a MAXIMUM! 😎
— BCCI (@BCCI) October 8, 2023
He remains unbeaten on 97* & #TeamIndia start #CWC23 with a superb win against Australia 🙌
Scorecard ▶️ https://t.co/ToKaGif9ri#CWC23 | #INDvAUS | #TeamIndia | #MeninBlue pic.twitter.com/rZRXGei1QNKL Rahul finishes off the chase with a MAXIMUM! 😎
— BCCI (@BCCI) October 8, 2023
He remains unbeaten on 97* & #TeamIndia start #CWC23 with a superb win against Australia 🙌
Scorecard ▶️ https://t.co/ToKaGif9ri#CWC23 | #INDvAUS | #TeamIndia | #MeninBlue pic.twitter.com/rZRXGei1QN
भारताचा टॉप ऑर्डर ढेपाळला : लक्ष्याचा पाठलागा करताना भारताची सुरुवात अतिशय खराब झाली. सलामीवीर इशान किशन पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याला स्टार्कनं ग्रीनच्या हाती झेलबाद केलं. कर्णधार रोहित शर्मा देखील भोपळा फोडू शकला नाही. त्याला हेजलवूडनं पायचित केलं. त्यानंतर चौथ्या क्रमाकांवर फलंदाजीला आलेला श्रेयस अय्यरही काही कमाल दाखवू शकला नाही. त्याला हेजलवूडनं शून्यावर वॉर्नरच्या हाती झेलबादं केलं.
-
End of a magnificent knock from Virat Kohli, who departs for 85 👏👏#TeamIndia 168/4, with 32 more runs to win.
— BCCI (@BCCI) October 8, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Follow the Match ▶️ https://t.co/ToKaGif9ri#CWC23 | #INDvAUS | #MeninBlue pic.twitter.com/YL4J8DrI6Y
">End of a magnificent knock from Virat Kohli, who departs for 85 👏👏#TeamIndia 168/4, with 32 more runs to win.
— BCCI (@BCCI) October 8, 2023
Follow the Match ▶️ https://t.co/ToKaGif9ri#CWC23 | #INDvAUS | #MeninBlue pic.twitter.com/YL4J8DrI6YEnd of a magnificent knock from Virat Kohli, who departs for 85 👏👏#TeamIndia 168/4, with 32 more runs to win.
— BCCI (@BCCI) October 8, 2023
Follow the Match ▶️ https://t.co/ToKaGif9ri#CWC23 | #INDvAUS | #MeninBlue pic.twitter.com/YL4J8DrI6Y
राहुल-कोहलीनं भारताचा डाव सावरला : पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या केएल राहुलनं विराट कोहलीच्या मदतीनं भारताचा डाव सावरला. या दोघांनी दमदार अर्धशतकं झळकावत भारताचा विजय सुनिश्चित केला. विराट कोहलीनं ११६ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीनं ८५ धावांची खेळी केली. दुसरीकडे, केएल राहुलनं त्याला उत्तम साथ दिली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी २१५ चेंडूत १६५ धावांची भागिदारी केली. त्यांच्या या खेळीनं ऑस्ट्रेलियाच्या तोंडून विजयाचा घास हिरावला गेला. केएल राहुलनं ११५ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीनं नाबाद ९७ धावा केल्या. दुसऱ्या टोकावर हार्दिक पांड्या ११ धावांवर नाबाद राहिला.
-
1⃣5⃣0⃣ partnership up now between Virat Kohli & KL Rahul 👏👏#TeamIndia need 48 runs more to win now 👌👌
— BCCI (@BCCI) October 8, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Follow the Match ▶️ https://t.co/ToKaGif9ri#CWC23 | #INDvAUS | #TeamIndia | #MeninBlue pic.twitter.com/mQVyiUsXb1
">1⃣5⃣0⃣ partnership up now between Virat Kohli & KL Rahul 👏👏#TeamIndia need 48 runs more to win now 👌👌
— BCCI (@BCCI) October 8, 2023
Follow the Match ▶️ https://t.co/ToKaGif9ri#CWC23 | #INDvAUS | #TeamIndia | #MeninBlue pic.twitter.com/mQVyiUsXb11⃣5⃣0⃣ partnership up now between Virat Kohli & KL Rahul 👏👏#TeamIndia need 48 runs more to win now 👌👌
— BCCI (@BCCI) October 8, 2023
Follow the Match ▶️ https://t.co/ToKaGif9ri#CWC23 | #INDvAUS | #TeamIndia | #MeninBlue pic.twitter.com/mQVyiUsXb1
स्टीव स्मीथच्या ४६ धावा : पाच धावांच्या स्कोअरवर ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट पडली. जसप्रीत बुमराहनं मिचेल मार्शला विराट कोहलीच्या हाती झेलबाद केलं. मार्शनं सहा चेंडूंचा सामना केला, पण त्याला खातंही उघडता आलं नाही. त्यानंतर आलेल्या स्टीव स्मीथनं डेव्हिड वॉर्नरसोबत डावाला आकार दिला. मात्र फिरकीपटू कुलदीप यादवनं वॉर्नरचा अडथळा दूर केला. यादवनं वॉर्नरला ४१ धावांवर तंबूत पाठवलं. त्यानं ५२ चेंडूंचा सामना केला. त्यानंतर फिरकीपटू रविंद्र जडेजाचा कहर पाहायला मिळाला. जडेजानं आधी स्मिथला ४६ धावांवर बोल्ड केलं. त्यानंतर लाबुशेनला २७ आणि ॲलेक्स कॅरीला ० धावांवर तंबूत पाठवलं. कुलदीपनं मॅक्सवेलला १५ धावांवर बोल्ड केलं.
शुभमन गिलच्या जागी इशान किशन : या वर्ल्डकपसाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ फेव्हरेट आहेत. टीम इंडियानं गेल्या तीन विश्वचषकांमध्ये विजयानं आपल्या मोहिमेची सुरुवात केली. अशा परिस्थितीत आजही भारताची सुरुवात विजयानं व्हावी अशी क्रिकेटप्रेमींची अपेक्षा आहे. मात्र या सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का बसला. फॉर्ममध्ये असलेला टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिल आजारी आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो खेळू शकणार नाही. त्याच्या अनुपस्थितीत युवा इशान किशन टीममध्ये संधी मिळाली आहे.
दोन्ही संघाची प्लेइंग ११ :
भारत : इशान किशन, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, कॅमरून ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, ॲलेक्स कॅरी, मार्कस स्टॉयनिस, अॅडम झम्पा, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क.
पॅट कमिन्स : आम्ही प्रथम फलंदाजी करू. विकेट चांगली आहे. बॅटिंगसाठी दुपारची परिस्थिती अनुकुल असते. आम्ही चांगल्या टचमध्ये आहोत. बरेच क्रिकेट खेळल्यानं आमचं संतुलन चांगलं आहे. ट्रॅव्हिस हेड अॅडलेडमध्ये आहे. अॅबॉट, स्टॉइनिस आणि इंग्लिस टीममध्ये नाहीत.
रोहित शर्मा : गोलंदाजांसाठी चांगली परिस्थिती आहे. जसजसा खेळ पुढे जाईल तसतसा चेंडू वळेल. तुम्हाला कोणत्या लाइन आणि लेन्थवर गोलंदाजी करायची हे समजून घेणं आवश्यक आहे. आम्ही यावर्षी खूप क्रिकेट खेळलो. सराव सामन्यांपूर्वी दोन चांगल्या मालिका खेळल्या. आम्ही सर्व बेस कव्हर केले आहे. दुर्दैवानं, शुभमन गिल वेळेत बरा झाला नाही. आम्ही आज सकाळपर्यंत वाट पाहिली, मात्र तो बरा होऊ शकला नाही. त्याच्या जागी इशान संघात आला आहे.
हेही वाचा :