नवी दिल्ली ICC ODI Ranking : भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल आता जगातील सर्वोत्तम एकदिवसीय फलंदाज बनला आहे. आयसीसीनं (ICC) जाहीर केलेल्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत शुभमन गिलनं अव्वल स्थानी झेप घेतली. त्यानं पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमला मागे टाकत हा पराक्रम केला.
अव्वल स्थान गाठणारा केवळ चौथा भारतीय : सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्यानंतर एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान गाठणारा गिल हा चौथा भारतीय फलंदाज ठरला. शुभमन गिल गेल्या एक वर्षापासून उत्कृष्ट कामगिरी करत आहे. आजारपणामुळे तो या विश्वचषकातील सुरुवातीचे दोन सामने खेळू शकला नाही. मात्र त्यानंतर त्यानं संधी मिळताच जोरदार पुनरागमन केलं. स्पर्धेतील सहा डावांत त्यानं एकूण २१९ धावा केल्या आहेत.
-
A big day for India's #CWC23 stars with two new No.1 players crowned in the latest @MRFWorldwide ICC Men's ODI Player Rankings 😲
— ICC (@ICC) November 8, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Details 👇https://t.co/nRyTqAP48u
">A big day for India's #CWC23 stars with two new No.1 players crowned in the latest @MRFWorldwide ICC Men's ODI Player Rankings 😲
— ICC (@ICC) November 8, 2023
Details 👇https://t.co/nRyTqAP48uA big day for India's #CWC23 stars with two new No.1 players crowned in the latest @MRFWorldwide ICC Men's ODI Player Rankings 😲
— ICC (@ICC) November 8, 2023
Details 👇https://t.co/nRyTqAP48u
श्रेयस अय्यरची मोठी झेप : विशेष म्हणजे, २०२१ मध्ये बाबर आझमनं विराट कोहलीकडून नंबर १ चं स्थान हिसकावून घेतलं होतं. याची परतफेड आता गिलनं केली आहे. एकदिवसीय फलंदाजांच्या यादीत श्रेयस अय्यरनं १७ स्थानांनी मोठी झेप घेत १८ वं स्थान पटकावलं. तर विश्वचषकात आतापर्यंत ५४३ धावा ठोकणारा कोहली तीन स्थानांनी झेप घेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक आहे.
मोहम्मद सिराजही अव्वल स्थानी : शुभमन गिलसह भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनं देखील आयसीसीनं क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली. त्यानं पाकिस्तानच्या शाहीन शाह आफ्रिदीकडून नंबर १ वनडे गोलंदाजाचं सिंहासन हिसकावून घेतलं. या आधी तो तिसऱ्या क्रमांकावर होता. चालू विश्वचषकात सिराजनं दमदार कामगिरी करत आतापर्यंत १० विकेट घेतल्या आहेत. गोलंदाजांच्या क्रमवारीत कुलदीप यादव (४), जसप्रीत बुमराह (८) आणि मोहम्मद शमी (१०) हे अव्वल १० मध्ये आहेत.
हेही वाचा :
- Cricket World Cup 2023 : मॅक्सवेलच्या अंगात आलं! अफगाणिस्तानला एकहाती धोबीपछाड दिला
- Cricket World Cup 2023 AUS vs AFG : अदभूत, अविश्वसनीय! 'संकटमोचक' मॅक्सवेलनं एकाच खेळीत मोडले अनेक विक्रम
- Cricket World Cup 2023 : विश्वचषकात धुमाकूळ घालणाऱ्या रचिन रवींद्रला आवडतात दक्षिण भारतीय पदार्थ, आजोबांनी शेअर केले किस्से