ETV Bharat / sports

पुजारा-रहाणे रणजी ट्रॉफीमध्ये परततील आणि भरपूर धावा करतील - बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली - Pujara-Rahane will return to Ranji Trophy

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (Board of Control for Cricket in India) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ज्येष्ठ कसोटीपटू चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्याकडून रणजी ट्रॉफीमध्ये खेळून भरपूर धावा करण्याची अपेक्षा केली आहे.

PUJARA AND RAHANE
पुजारा-रहाणे
author img

By

Published : Feb 4, 2022, 4:03 PM IST

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली (BCCI President Sourav Ganguly) यांनी ज्येष्ठ कसोटीपटू चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्याकडून रणजी ट्रॉफीमध्ये खेळून भरपूर धावा करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला 2-1 ने मालिकेत पराभव पत्करावा लागला होता. ज्यामध्ये रहाणे आणि पुजारा यांना सहा डावांत फक्त एक अर्धशतक झळकावताना केवळ अनुक्रमे 136 आणि 135 धावा करता आल्या होत्या.

रणजी ट्रॉफीची पुनरारंभ (Ranji Trophy Tournament Restart) श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या अगोदर होणार आहे, कारण दोघांवरही कसोटी संघात आपली जागा कायम ठेवण्याचा दबाव आहे. सौरव गांगुली एका मीडिया आउटलेटला रहाणे आणि पुजारा यांच्याबद्दल बोलताना म्हणाले,"हो, ते खूप चांगले खेळाडू आहेत. आशा आहे की, ते रणजी ट्रॉफीमध्ये परत जातील (Pujara-Rahane will return to Ranji Trophy) आणि खूप धावा करतील, जे ते करतील याची मला खात्री आहे. मला वाटते त्यांना कोणतीही अडचण असणार नाही. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप काही केले आहे."

"रणजी करंडक ही एक मोठी स्पर्धा आहे, आणि आम्ही सर्वांनी ही स्पर्धा खेळली आहे. त्यामुळे, ते तिथे परत जाऊन कामगिरी करतील. त्यांनी भूतकाळात स्पर्धा खेळल्या आहेत जेव्हा ते फक्त कसोटी क्रिकेट खेळत होते आणि एकदिवसीय किंवा टी-20 संघाचा भाग नव्हते. त्यामुळे, त्यांना कोणतीही अडचण येणार नाही," असे भारताचा माजी कर्णधार गांगुली म्हणाला.

गांगुलीने कबूल केले की 2021/22 हंगामात होणाऱ्या रणजी ट्रॉफीसाठी खिडकी शोधणे हे एक मोठे आव्हान होते, कारण तिसऱ्या लाटेने ते 13 जानेवारीपासून पुढे ढकलले होते. "साहजिकच, आम्ही रणजी ट्रॉफीचे एक वर्ष गमावले. ही भारतातील सर्वात महत्वाची स्पर्धा आहे आणि आम्हाला ती नेहमीच आयोजित करायची होती. पण मला वाटत नाही की जगाने काय पाहिले आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे आयुष्यात भरपूर बदल घडले आहेत.

"म्हणून या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, कोणत्याही स्पर्धेचे आयोजन करणे खरोखरच एक आव्हान होते. आम्ही कूचबिहार ट्रॉफीचे आयोजन केले आणि तिसरी लाट आली. पहिल्याच दिवशी 50 खेळाडूंना विषाणूची लागण झाली. त्यामुळे हे सोपे नव्हते. पण आम्ही नशीबवान आहोत की आम्ही अजूनही स्पर्धा आयोजित करू शकत आहोत."

गांगुलीने वरिष्ठ महिला T20 लीग आणि अंडर-19 कूचबिहार ट्रॉफीच्या नॉकआउट्सबद्दल माहिती देखील दिली. "कुचबिहार ट्रॉफीसाठी (Cooch Behar Trophy) आमच्याकडे वेळ आहे. हा कोविड थोडा शांत होऊ द्या, आम्ही ते थांबवू शकतो कारण ते सध्या बाद फेरीत आहे आणि फक्त काही सामने बाकी आहेत. आम्ही ते आयोजन एप्रिल-मेमध्ये करू शकतो. त्याचप्रमाणे, महिला स्पर्धा, आम्ही ते देखील करू. आम्ही असे गृहीत धरत आहोत की आणखी एका महिन्यात कोरोना प्रकरणांची संख्या कमी होईल आणि आम्ही ते आयोजित करू शकू."

हेही वाचा : Ranji Trophy 2021-22 : रणजी ट्रॉफीचा पहिला टप्पा 10 फेब्रुवारीपासून सुरू होणार, पहा पूर्ण वेळापत्रक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.