ETV Bharat / sports

Henry Nicholls Injury : गंभीर दुखापतीतून बचावलेला हेन्री निकोल्स, इंग्लंडला जाण्यासाठी सज्ज

न्यूझीलंड कसोटी क्रिकेट संघाचा प्रमुख फलंदाज हेन्री निकोल्स गंभीर दुखापतीतून बचावला आहे. त्यामुळे बुधवारी न्यूझीलंड कसोटी क्रिकेट संघाने ( New Zealand Test Cricket Team ) सुटकेचा नि:श्वास सोडला.

Henry Nicholls
Henry Nicholls
author img

By

Published : May 11, 2022, 6:42 PM IST

ऑकलंड : 2 जूनपासून न्यूझीलंडचा संघ लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळणार आहे. या अगोदर माउंट मौनगानुई येथील प्री-टूर कॅम्पमध्ये सुरू असलेल्या सराव सत्रादरम्यान निकोल्सला दुखापत झाली ( Henry Nichols was injured ) होती, ज्यासाठी खेळाडूला सीटी स्कॅन करावे लागले. आयसीसीनुसार, 30 वर्षीय खेळाडू इंग्लंडला रवाना होईल आणि 2 जूनपासून पहिली कसोटी खेळेल.

न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टेड ( New Zealand coach Gary Stead ) यांनी बुधवारी सांगितले की, सीटी स्कॅनचा अहवाल सकारात्मक आहे. त्याला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. ही दुखापत बरी होण्यासाठी दोन ते तीन आठवडे लागतील पण ही गंभीर समस्या नाही. दुखापतीमुळे तो दोन सराव सामन्यांना उपस्थित राहू शकणार नाही. कारण या काळात तो फिजिओ विजय वल्लभ आणि ट्रेनर ख्रिस डोनाल्डसन यांच्या देखरेखीखाली असेल.

ते पुढे म्हणाले की, हेन्री पाचव्या क्रमांकावर आमच्यासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे आणि आम्हाला माहित आहे की तो लवकरच संघात आपली उपस्थिती लावेल. निकोल्स हा न्यूझीलंडच्या कसोटी संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे. त्याने 46 कसोटींमध्ये 40.38 च्या सरासरीने आठ शतके झळकावली आहेत.आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सध्याच्या चक्रात, मधल्या फळीतील फलंदाजाने सहा सामन्यांमध्ये 280 धावा केल्या आहेत, ज्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ब्लॅक कॅप्सच्या सर्वात अलीकडील कसोटी मालिकेतील शतकाचा समावेश आहे.

गेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये ( World Test Championship ), निकोल्स आपल्या संघासाठी 11 सामन्यांत 39.46 च्या सरासरीने 592 धावा करणारा तिसरा खेळाडू ठरला. 2 जूनपासून लॉर्ड्सवर सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड न्यूझीलंडची आतुरतेने वाट पाहत आहे. यजमान सध्या 12.50 गुणांसह डब्ल्यूटीसी गुणतालिकेत ( WTC Point Table ) तळाशी आहेत, तर न्यूझीलंड 38.88 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.

हेही वाचा - IPL 2022 Updates : रवींद्र जडेजाला दुहेरी फटका; कर्णधारपद गेल्यानंतर आता आयपीएलमधून बाहेर होण्याची टांगती तलवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.