मुंबई - मध्य प्रदेश आणि दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज आवेश खान याने आयपीएलविषयी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने, देशाअंतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली. परंतु, आयपीएलमुळे प्रसिद्धी मिळाली असल्याचे सांगितलं आहे.
आवेश खानने आयएएनएसला एक मुलाखत दिली आहे. त्यात तो म्हणाला, देशाअंतर्गत क्रिकेटमधील स्पर्धांमध्ये मागील दोन हंगामात मी चांगले प्रदर्शन केले. परंतु, आयपीएलमधील कामगिरीमुळे मला प्रसिद्धी मिळाली. या वर्षी सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत मी ५ सामन्यात १४ गडी बाद केले आहेत. तसेच या वर्षी मी दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएल खेळलो. यामुळे माझ्या आत्मविश्वासात भर पडली आहे.
मी चांगली कामगिरी केली आणि संघाने विजय देखील मिळवले. आम्ही गुणतालिकेत अव्वलस्थानी होते. यामुळे मी कॉन्फिडेंट आहे. मला जी जबाबदारी मिळाली. ती मी चांगल्या पद्धतीने पार पाडली. नवा चेंडू, मिडल ओव्हर किंवा डेथ ओव्हर प्रत्येक स्पेलमध्ये मी गोलंदाजी केली. संघाचे प्रशिक्षकांनी मला खूप आत्मविश्वास दिला. यामुळे मी ही कामगिरी करु शकलो, असे देखील आवेश खान म्हणाला.
दरम्यान, भारतीय संघ इंग्लंड दौरा करणार आहे. या दौऱ्यासाठी आवेश खान याची निवड भारतीय संघात राखीव खेळाडू म्हणून करण्यात आलेली आहे. त्याने आयपीएलमध्ये १४ गडी बाद केले आहेत. तो सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी राहिला. जर रणजी स्पर्धेतील त्याच्या कामगिरी विषयी बोलायचे झाल्यास, त्याने २०१९-२० मध्ये पाच सामन्यात २८ गडी बाद केले आहेत.
हेही वाचा - प्रसिद्ध कृष्णाला कोरोनाची लागण, केकेआरचा ठरला चौथा खेळाडू
हेही वाचा - अजिंक्यने टोचून घेतली लस; फोटो शेअर करत देशवासियांना केलं आवाहन