ETV Bharat / sports

WTC Final मध्ये हर्षा भोगलेंनी का दिलं समालोचन करण्यास नकार - डब्ल्यूटीसी फायनल २०२१

हर्षा भोगले यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं की, 'जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी मी या आठवड्यामध्ये साउथम्पटनला उपलब्ध राहणार होतो. परंतु क्वारंटाईनच्या नियमांमुळे, मला एका सामन्यासाठी २७ ते २८ दिवस घरापासून दूर राहावे लागणार होतं. मी बायो बबलमध्ये भरपूर वेळ घालवला आहे. पुढेही भरपूर वेळ घालवायचा आहे. पण सध्या मी घरीच ठीक आहे. यामुळे मला माघार घ्यावी लागली.'

Harsha Bhogle Pulls Out Of ICC WTC Final Commentary Team; Tweets Reason For His Decision
WTC Final मध्ये हर्षा भोगलेंनी का दिलं समालोचन करण्यास नकार
author img

By

Published : Jun 17, 2021, 5:05 PM IST

मुंबई - हर्षा भोगले हे समालोचन क्षेत्रातील नावाजलेलं नाव आहे. परंतु ते भारत आणि न्यूझीलंड या संघात होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात समालोचन करणार नाहीत. याचं कारण खुद्द त्यांनी ट्विट करत सांगितलं आहे.

हर्षा भोगले यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं की, 'जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी मी या आठवड्यामध्ये साउथम्पटनला उपलब्ध राहणार होतो. परंतु क्वारंटाईनच्या नियमांमुळे, मला एका सामन्यासाठी २७ ते २८ दिवस घरापासून दूर राहावे लागणार होतं. मी बायो बबलमध्ये भरपूर वेळ घालवला आहे. पुढेही भरपूर वेळ घालवायचा आहे. पण सध्या मी घरीच ठीक आहे. यामुळे मला माघार घ्यावी लागली.'

  • I was hoping to be in Southampton this week for the #WTCFinals. But quarantine requirements meant I would have to be away for 27-28 days for one game. I have spent a lot of time in bubbles and there are more ahead. I am enjoying being home and so, regretfully, had to pull out

    — Harsha Bhogle (@bhogleharsha) June 15, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान, आयसीसीने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी इंग्लिश भाषेसाठी समालोचकांची यादी जाहीर केली आहे. यात सुनिल गावसकर आणि इयान बिशप सारख्या दिग्गज समालोचकाचा समावेश आहे. गावसकर आणि बिशप यांच्यासोबत कुमार संगकारा, नासीर हुसेन, सायमन डूल, ईशा गुहा, माईकल आथर्टन, क्रेग मॅकमिल आणि दिनेश कार्तिक हे देखील अंतिम सामन्यात समालोचन करणार आहेत.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उद्या शुक्रवारपासून साउथम्पटन येथे अंतिम सामन्याला सुरूवात होणार आहे. जगभरातील क्रिकेटप्रेमींमध्ये या सामन्याची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

  • न्यूझीलंडचा संघ -
  • केन विलियम्सन ( कर्णधार), टॉम ब्लंडल, ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉनवेय, कॉलीन डी ग्रँडहोम, मॅट हेन्री, कायले जेमिन्सन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, अजाझ पटेल, टीम साऊदी, रॉस टेलर, नेल वॅगनर, बीजे वॉटलिंग आणि विल यंग.
  • भारताचा संघ -
  • रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत, वृद्धीमान साहा, आर अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज.

हेही वाचा - कॅमेऱ्याला पाहू की तुला? बुमराहचा खट्याळ प्रश्न; पाहा संजनाने घेतलेली जसप्रीतची मुलाखत

हेही वाचा - राहुल-अथियाच्या खास फोटोमुळे रंगली पुन्हा चर्चा; अफेअरच्या चर्चांना ऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.