ETV Bharat / sports

हार्दिक पांड्यानं गुजरातची साथ सोडली, मुंबई इंडियन्समध्ये दाखल

Hardik Pandya : अष्टपैलू हार्दिक पांड्या अखेर गुजरात टायटन्समधून मुंबई इंडियन्समध्ये दाखल झालाय. सूत्रांनुसार, हार्दिकला रिटेन केल्यानंतर गुजरात आणि मुंबईमध्ये ट्रेड डील झाली. मात्र याबाबत दोन्ही फ्रेंचाईजीकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Hardik Pandya
Hardik Pandya
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 26, 2023, 8:09 PM IST

Updated : Nov 26, 2023, 9:06 PM IST

मुंबई Hardik Pandya : हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाला आहे. मुंबईनं गुजरात टायटन्ससोबत ट्रेडच्या माध्यमातून हार्दिकला आपल्या संघात शामील केलं. आता आयपीएल २०२४ मध्ये हार्दिक मुंबईच्या संघाकडून खेळताना दिसणार आहे.

संपूर्ण कॅश डील झाली : रिपोर्टनुसार, मुंबईनं हार्दिक पांड्याला आयपीएल २०२४ साठी आपल्या संघात समाविष्ट केलं. ही संपूर्ण कॅश डील आहे, म्हणजेच गुजरातनं या डीलमध्ये मुंबई इंडियन्सकडून एकही बदली खेळाडू घेतला नाही. मात्र याबाबत दोन्ही फ्रेंचाईजीकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. गुजरातमध्ये जाण्यापूर्वी हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा भाग होता. मुंबईकडूनच त्यानं आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं.

  • 📢THE BIGGEST TRADE IN IPL HISTORY📢

    Here we go 🔨 Hardik Pandya to Mumbai Indians - Done deal 🔐

    Gujarat Titans retains their captain Hardik Pandya and accepts the trade with Mumbai Indians ✍️

    📸: IPL#IPL2024 pic.twitter.com/oaz2b6fCmk

    — CricTracker (@Cricketracker) November 26, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हार्दिकची आयपीएल फी १५ कोटी रुपये : बीसीसीआय आणि आयपीएलच्या सूत्रांनुसार, या ट्रेडसाठी औपचारिक मान्यता देण्यात आली. मात्र ट्रेडचं मूल्य किती हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ३० वर्षीय हार्दिकची आयपीएल फी वर्षाला १५ कोटी रुपये आहे. २०२४ मध्ये रोहित शर्माचं मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणार आहे. दुसरीकडे, मुंबईनं स्टार गोलंदाज जोफ्रा आर्चरला संघाबाहेरचा रस्ता दाखवला. त्याला रिटेन करण्यात आलेलं नाही. याशिवाय रिपोर्टनुसार, कॅमरून ग्रीनला आरसीबीसोबत ट्रेड करण्यात आलंय.

  • 🚨 REPORTS 🚨

    🔹 Hardik Pandya has been traded to Mumbai Indians in an all-cash deal.
    🔸 Meanwhile, Mumbai Indians have traded Cameron Green to Royal Challengers Bangalore in an all-cash deal.

    Absolute madness on the IPL retentions day 🤯#CricketTwitter #IPL2024 pic.twitter.com/Vk05yQ6ZkL

    — Sportskeeda (@Sportskeeda) November 26, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पहिल्या सीझनमध्ये गुजरातला चॅम्पियन बनवलं : २०२२ मध्ये आयपीएलमध्ये नव्यानं आलेल्या गुजरात टायटन्सनं त्याला खरेदी केलं होतं. विशेष म्हणजे, आपल्या पहिल्याच हंगामात संघाचं नेतृत्व करताना त्यानं गुरातला चॅम्पियन बनवलं. यानंतर आयपीएल २०२३ मध्ये हा संघ उपविजेता राहिला होता. अंतिम सामन्यात महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जनं शेवटच्या चेंडूवर त्यांचा पराभव केला. तर मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल २०२२ चा हंगाम खूपच खराब राहिला. संघाला १४ पैकी फक्त ४ सामन्यात विजय मिळवता आला. ते गुणतालिकेत शेवटच्या स्थानी राहिले.

हेही वाचा :

  1. धोनी आयपीएल २०२४ खेळणार! बेन स्टोक्सचा होणार लिलाव; जाणून घ्या संपूर्ण यादी

Last Updated : Nov 26, 2023, 9:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.