मुंबई - भारतीय फिरकीपटू हरभजन सिंग आणि त्याची पत्नी अभिनेत्री गीता बसरा यांच्या घरी एक नवा पाहुणा आला आहे. दोघेही दुसऱ्यांदा माता-पिता झाले असून गीताने एका मुलाला जन्म दिला. हरभजनने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. दरम्यान, याआधी दोघांना एक मुलगी आहे.
हरभजनने त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'देवाने आम्हाला एक स्वस्थ मुलाच्या रुपात आशीर्वाद दिले आहेत यामुळे मी आम्ही देवाला धन्यवाद देतो. गीता आणि मुलगा दोघेही सुखरुप आहेत. आम्ही दोघेही अत्यंत आनंदी असून सर्व शुभचिंतकाचे त्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आणि आशिर्वादाबद्दल आभार मानतो.'
गीता आणि हरभजन यांनी २९ ऑक्टोबर २०१५ रोजी लग्नगाठ बांधली. २०१६ मध्ये त्यांच्या घरी एका मुलीचा जन्म झाला. त्यांनी तिचे नाव हिनाया असे ठेवले आहे. आता हरभजन गीता यांच्या घरी एक मुलगा जन्मला आहे.
दरम्यान, हरभजन सिंगच्या पोस्टवर अनेक चाहते शुभेच्छा देत आहेत. भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन याने देखील हरभजनला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने लिहिलं आहे की, 'पाजी बहुत मुबारकां.' शिखरसह अनेकांनी हरभजन आणि गीताला शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा - धडाकेबाज क्रिकेटर शेफाली वर्मा 10वी उत्तीर्ण; पाहा किती मिळाले गुण
हेही वाचा - Ind w vs Eng w : हरलीन देओल घेतलेला 'सुपर झेल', पाहणारा प्रत्येक जण झाला थक्क