हैदराबाद Gujrat Titans Captain : विश्वचषक संपताच इंडियन प्रीमियर लीग 2024 ची तयारी सुरु झालीय. सर्व संघांनी त्यांच्या खेळाडूंची रिलीज आणि कायम ठेवण्याची यादीही जाहीर केलीय. या दरम्यान गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यानं गुजरातला सोडचिठ्ठी देत आयपीएलमध्ये घरवापसी केलीय. पांड्या बाहेर पडताच गुजरातनं संघासाठी नवा कर्णधार निवडलाय. गुजरातनं युवा फलंदाज शुभमन गिलला आपल्या संघाचा कर्णधार बनवलंय. गुजरात टायटन्सनं याची अधिकृत घोषणाही केलीय.
पांड्याची आयपीएलमध्ये घरवापसी : अष्टपैलू हार्दिक पांड्याला मुंबईनं आपल्या संघात परत घेतलंय. पांड्याला 2022 मध्ये गुजरातचा कर्णधार बनवण्यात आलं होतं. पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातचा संघ चॅम्पियनही झाला. गुजरातनं पांड्याला आयपीएल 2024 साठीही कायम ठेवलं होतं, पण मुंबईनं गुजरात टायटन्सशी करार केलाय. हा व्यवहार रोख रकमेनं झालाय. त्यामुळं पांड्याच्या बदल्यात मुंबईला गुजरातला पैसे द्यावे लागणार आहेत.
-
𝐂𝐀𝐏𝐓𝐀𝐈𝐍 𝐆𝐈𝐋𝐋 🫡#AavaDe pic.twitter.com/tCizo2Wt2b
— Gujarat Titans (@gujarat_titans) November 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">𝐂𝐀𝐏𝐓𝐀𝐈𝐍 𝐆𝐈𝐋𝐋 🫡#AavaDe pic.twitter.com/tCizo2Wt2b
— Gujarat Titans (@gujarat_titans) November 27, 2023𝐂𝐀𝐏𝐓𝐀𝐈𝐍 𝐆𝐈𝐋𝐋 🫡#AavaDe pic.twitter.com/tCizo2Wt2b
— Gujarat Titans (@gujarat_titans) November 27, 2023
शुभमन गिल नवा कर्णधार : पांड्या बाहेर पडताच गुजरातनं शुभमनला कर्णधार बनवलं. शुभमनची आतापर्यंतची कारकीर्द उत्कृष्ट राहिलीय. त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेकदा अप्रतिम कामगिरी करुन दाखवली आहे. यासोबतच त्यानं आयपीएलमध्येही चमक दाखवलीय. शुभमननं आयपीएलमध्ये आतापर्यंत 91 सामने खेळले आहेत. यात त्यानं 2790 धावा केल्या आहेत. तसंच आयपीएलमध्ये त्यानं 3 शतकंही झळकावली आहेत. यासोबतच त्याची 18 अर्धशतकंही आहेत. आयपीएलमध्ये 129 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.
आयपीएलनं केली अधिकृत घोषणा : आयपीएलनं हार्दिक पांड्या आणि कॅमेरून ग्रीनबद्दलची माहिती शेअर केली आहे. आयपीएलनं सांगितलं की, हार्दिक पांड्याला मुंबईनं ट्रेड केलंय. तर कॅमेरून ग्रीनला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं खरेदी केलंय. ऑस्ट्रेलियन खेळाडू ग्रीनआयपीएलमध्ये आतापर्यंत 16 सामने खेळले आहेत. यात त्यानं 452 धावा केल्या आहेत. यासोबतच 6 विकेट्सही घेतल्या आहेत.
कर्णधार बनल्यावर गिलचं मोठं वक्तव्य : कर्णधार झाल्यावर शुभमन गिल म्हणाला, ''गुजरात टायटन्सचं कर्णधारपद स्वीकारताना मला आनंद होत आहे. एवढ्या चांगल्या संघाचं नेतृत्व करणे ही मोठी गोष्ट आहे. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी फ्रँचायझीचे आभार मानतो. आमच्याकडं दोन चांगले हंगाम झाले आहेत.'' गुजरात टायटन्सनं 2022 आणि 2023 हंगामात भाग घेतला होता. त्यांच्या पदार्पणाच्या मोसमातच त्यांनी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावलं. गेल्या मोसमात ते उपविजेते ठरले होते.
हेही वाचा :