मुंबई : डब्ल्युपीएलचा सहावा सामना आज होणार आहे. स्नेह राणा यांच्या नेतृत्वाखालील गुजरात जायंट्स (GG) स्मृती मानधना यांच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध लढेल. गुजरात जायंट्स (GG) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) त्यांचे दोन्ही सामने गमावले आहेत. आजचा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघांचे खेळाडू कोणतीही कसर सोडू इच्छित नाहीत.
बेथ मुनी खेळण्याची शक्यता कमी : गुजरातची खेळाडू बेथ मुनी आजच्या सामन्यात खेळणार की नाही याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. 4 मार्च रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात मुनीला गुडघ्याला दुखापत झाली होती. गुजरात जायंट्सचा संघ तो सामना हरला होता. 5 मार्चला स्नेह राणाच्या नेतृत्वाखाली गुजरात जायंट्स संघाचा सामना यूपी वॉरियर्सशी झाला. या सामन्यातही जायंट्सला पराभवाचा सामना करावा लागला.
यूपी वॉरियर्स 2 गुणांसह तिसऱ्या स्थानावर : पॉइंट टेबलमध्ये आरसीबी चौथ्या आणि गुजरात जायंट्स पाचव्या स्थानावर आहे. त्याचवेळी मुंबई इंडियन्स त्यांचे दोन्ही सामने जिंकून चार गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटल्सनेही दोन्ही सामने जिंकले असून चार गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. दोनपैकी एक सामना जिंकून यूपी वॉरियर्स 2 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संभाव्य संघ : 1 स्मृती मानधना (क), 2 सोफी डेव्हाईन/डेन व्हॅन निकर्क, 3 दिशा कसाट, 4 एलिस पेरी, 5 हीदर नाइट, 6 रिचा घोष (विकेटकीपर), 7 कनिका आहुजा, 8 श्रेयंका पाटील, 9 रेणू सिंग, 10 मेगन शुट, 11 सहाना पवार/प्रीती बोस.
गुजरात जायंट्स संभाव्य संघ: 1 सोफिया डंकले, 2 एस मेघना, 3 हरलीन देओल, 4 ॲशले गार्डनर, 5 सुषमा वर्मा (विकेटकीपर), 6 दयालन हेमलता, 7 ॲनाबेल सदरलँड/जॉर्जिया वेरेहम, 8 स्नेह राणा (कॅप्टन), 10 किम गर्थ, 11 मानसी जोशी, 9 तनुजा कंवर.
हेही वाचा : ICC Mens Player of the Month Nominees : आयसीसी मेन्स प्लेअर ऑफ द मंथ नामांकनामध्ये रवींद्र जडेजाचा समावेश