मुंबई - जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दोन्ही संघ हा सामना जिंकण्यासाठी भरपूर कष्ट घेत आहेत. या दरम्यान, न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज शेन बाँड याने रोहित शर्मा आणि ट्रेंट बोल्ट यांच्यात आयपीएलदरम्यान घडलेला किस्सा सांगितला.
शेन बाँड एका क्रीडा वाहिनीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाला की, अंतिम सामन्यात रोहित शर्मा आणि ट्रेंट बोल्ड यांच्यात चांगले दंद्व पाहायला मिळेल. कारण आयपीएलमध्ये सरावादरम्यान, बोल्टने हिटमॅन रोहितची स्लेजिंग केली होती. दरम्यान, रोहित आणि बोल्ट हे आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतात. ते नेहमी सोबत सराव करत होते. तर शेन बाँड मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे.
बाँडने रोहित आणि बोल्टमध्ये सरावात झालेल्या बातचितीचा किस्सा सांगितला. तो म्हणाला की, 'बोल्ट रोहितला वेगाने गोलंदाजी करत होता. त्याचा सामना करणे रोहितसाठी कठीण ठरत होते. तेव्हा बोल्टने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तुझं काय होणार असे सांगत रोहितला डिवचलं होतं.'
रोहित मला एक खेळाडू म्हणून खूप आवडतो. कारण तो मॅथ्यू हेडन प्रमाणे प्रतिकूल परिस्थितीमध्ये शानदार खेळी करतो. तो वेगाने धावा करतो. यामुळे गोलंदाज दबावात येतात. यामुळे अंतिम सामन्यात रोहित आणि बोल्ट यांच्यातील दंद्व पाहण्याची मी प्रतिक्षा करू शकत नसल्याचे देखील बाँड म्हणाला.
- न्यूझीलंडचा संघ -
- केन विलियम्सन ( कर्णधार), टॉम ब्लंडल, ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉनवेय, कॉलीन डी ग्रँडहोम, मॅट हेन्री, कायले जेमिन्सन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, अजाझ पटेल, टीम साऊदी, रॉस टेलर, नेल वॅगनर, बीजे वॉटलिंग, विल यंग
- भारताचा संघ -
- रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत, वृद्धीमान साहा, आर अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव व मोहम्मद सिराज
हेही वाचा - Cristiano Ronaldo ची ६ सेंकदांची कृती अन् Coca-Cola ला २९,००० कोटींचं नुकसान, बघा VIDEO
हेही वाचा - WTC Final : न्यूझीलंडने प्रथम गोलंदाजी केली तर टीम इंडियाची काय होणार अवस्था, बाँडचे भाकित