ETV Bharat / sports

IPL 2022 Mega Auction : लिलावाच्या दुसर्‍या दिवसाठी कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक आहे, घ्या जाणून - आयपीएल 2022

आयपीएल 2022 (IPL 2022) चा हंगाम लवकरच सुरु होणार आहे. काल झालेल्या लिलावानंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक आहे. ते जाणून घेणार आहोत.

IPL 2022
IPL 2022
author img

By

Published : Feb 13, 2022, 12:06 PM IST

बंगळुरु: आयपीएल 2022 (IPL 2022) चा हंगाम लवकरच सुरु होणार आहे. तत्पुर्वी या स्पर्धेचा मेगा लिलाव बंगळुरु येथे पार पडत आहे. या लिलावाचा पहिला दिवस शनिवारी पार पडला आहे. त्याचबरोबर दुसऱ्या दिवासाचा लिलाव सोहळा आज (रविवारी) पार पडणार आहे. त्यापूर्वी आपण काल झालेल्या लिलावानंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक आहे. ते जाणून घेणार आहोत. आयपीएल 2022 या स्पर्धेच्या मेगा लिलावाचा पहिला दिवस ( first day of the mega auction) शनिवारी पार पडला. या पहिल्या दिवसात काही खेळाडूंनी अपेक्षित किंमती पेक्षा जास्त रक्कम मिळवली. तर काही खेळाडू खरेदीदार देखील मिळाला नाही.

आयपीएल 2022 मेगा लिलावाच्या (IPL 2022 Mega Auction) पहिल्या दिवशी, 11 सेटमध्ये 97 खेळाडू लिलावासाठी आले, त्यापैकी 74 खेळाडू वेगवेगळ्या संघांनी विकत घेतले आणि 23 खेळाडू विकले गेले नाहीत. पहिल्या दिवशी एकूण 74 खेळाडू यशस्वीरित्या एक किंवा दुसर्‍या फ्रँचायझीचा भाग होते, ज्यात 20 परदेशी खेळाडूंचा समावेश होता. सर्व दहा संघांनी मिळून पहिल्या दिवशी एकूण ₹3,88,10,00,000 रुपये खर्च केले.

आयपीएल 2022 मेगा लिलावाच्या दुसऱ्या दिवसासाठी 10 संघांकडे असलेली उर्वरित रक्कम -

आता मेगा ऑक्शनच्या दुसऱ्या दिवसाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याआधी, आम्ही तुम्हाला दुसऱ्या दिवशी सर्व संघांच्या पर्समध्ये शिल्लक असलेल्या रकमेची माहिती देणार आहोत.

  • पंजाब किंग्स - ₹28.65 कोटी
  • सनराइजर्स हैदराबाद - ₹20.15 कोटी
  • राजस्थान रॉयल्स - ₹12.15 कोटी
  • लखनऊ सुपर जायंट्स - ₹6.9 कोटी
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु - ₹9.25 कोटी
  • गुजरात टाइटन्स - ₹18.85 कोटी
  • चेन्नई सुपर किंग्स - ₹20.45 कोटी
  • कोलकाता नाइट राइडर्स - ₹12.65 कोटी
  • मुंबई इंडियंस - ₹27.85 कोटी
  • दिल्ली कॅपिटल्स - ₹16.5 कोटी

दुसऱ्या दिवसाच्या लिलावाची प्रक्रिया रविवारी दुपारी बारा वाजता सुरू होईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.