ETV Bharat / sports

Ind VS Eng 2nd Test : नाणेफेक जिंकून इंग्लंडचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय - भारत

भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

England win toss, opt to field against India in 2nd Test
Ind VS Eng 2nd Test : नाणेफेक जिंकून इंग्लंडचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय
author img

By

Published : Aug 12, 2021, 5:15 PM IST

लंडन - भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. यातील दुसऱ्या सामन्याला आजपासून लॉर्ड्सच्या मैदानावर सुरूवात झाली आहे. उभय संघातील या सामन्यात यजमान इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, उभय संघातील पहिला सामना पावसामुळे ड्रॉ झाला आहे.

नाणेफेक झाल्यानंतर बोलताना विराट म्हणाला, आम्ही नाणेफेक जिंकली असती तर प्रथम गोलंदाजीच स्वीकारली असती. पण प्रथम फलंदाजी करणे वाईट नाही. यात चांगल्या धावा करण्याची संधी आहे. आम्ही या सामन्यासाठी एक बदल केला आहे. शार्दुलच्या जागेवर इशांत शर्मा या सामन्यात खेळेल. आम्ही आजच्या सामन्यासाठी 12 खेळाडूंची निवड केली ज्यात अश्विनचा समावेश आहे. पण संघाचे हित आमच्यासाठी महत्वाचं आहे. प्रत्येक खेळाडू आपलं योगदान देऊ इच्छितो. हे फलंदाजाविषयी आहे. फक्त आम्हाला आमचं लक्ष्य पूर्ण करायचे आहे.

इंग्लंडचा कर्णधार जो रूट नाणेफेक जिंकल्यानंतर म्हणाला, आम्ही गोलंदाजीसोबत जाऊ. खेळपट्टीवर असलेलं गवत पाहता गोलंदाजी करणे उचित ठरेल. संघात तीन बदल आहेत. यात क्राउलीच्या जागेवर हमीद, ब्राँडच्या जागेवर वुड आणि लॉरेन्सच्या जागेवर अलीला संघात स्थान देण्यात येत आहेत. अली अनुभवी खेळाडू आहे. तो धावा आणि विकेट घेण्यात मदत करतो.

भारतीय संघ -

रोहित शर्मा, के एल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज

इंग्लंड संघ -

रोरी बर्न्स, डोमिनिक सिब्ली, हशिब हमिद, जो रुट (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, मोईन अली, सॅम कुरेन, ओली रॉबिनसन, मार्क वूड आणि जेम्स अँडरसन.

हेही वाचा - Eng vs Ind, 2nd Test: भारताला मोठा धक्का, शार्दुल ठाकूर दुसऱ्या कसोटीतून बाहेर

हेही वाचा - Exclusive: टीम इंडियाच्या प्लेईंग 11 बाबत मोहम्मद कैफचे मत, म्हणाला...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.